नागपूर - नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगावजवळ एका चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. कारमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने जीवितहानी नाही -
सुदैवाने कारमध्ये बसलेल्या प्रवाशांनी प्रसंगावधान ठेवत धूर निघताच कारमधून बाहेर पडले. बघता बघता डोळ्यासमोर गाडी आगीने पूर्ण पेटल्या जळून खाक झाली. त्यामुळे कारमधील प्रवासी सुखरूप असून कोणालाही इजा झालेली नाही. महामार्गावर अचानक या कारने पेट घेतल्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. वेळीच लक्षात आल्याने जीवितहानी टळली.
हेही वाचा - विरोधी पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे - विजय वडेट्टीवार