नागपूर - सिंचन घोटाळाप्रकरणी जनमंचच्या याचीकेवर आज नागपूर खंडपीठात सुनावणी करण्यात आली. येत्या १३ फेब्रुवारीला याचिकाकर्त्यांच्या सर्व मागण्यांवर अंतिम सुनावणी होईल, असा निर्णय नागपूर खंडपीठातर्फे देण्यात आला आहे.
राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा, अशी मागणी जनमंच या सामाजिक संस्थेनी केली होती. राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या तपास यंत्रणांकडून तपास काढून टाकावा, अशी मागणी जनमंचतर्फे होती. दरम्यान, सिंचन घोटाळ्यात मी आरोपी नसून, मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना कोणत्याही भ्रष्ट अथवा बेकायदा कृत्यात सहभागी झालो नसल्याचे शपथपत्र अजित पवारांनी काल नागपूर खंडपीठात सादर केले होते. अजित पवार यांच्याकडून प्रसाद ढाकेफळकर यांनी बाजू मांडली.
हेही वाचा- पतंग उडवा, मात्र मेट्रो लाईनच्या दूर; मेट्रोचे नागपूरकरांना आवाहन