ETV Bharat / state

VIDEO : ...अन् पेट्रोल पंपावरच भिडले तरुण-तरुणी

author img

By

Published : Mar 15, 2020, 5:18 PM IST

Updated : Mar 15, 2020, 5:43 PM IST

पेट्रोल पंपावर अश्लील शेरेबाजी केल्यामुळे तरुणीने समोर येऊन तरुणाला जाब विचारला. तेव्हा मद्यपान केलेल्या तरुणाने (पिवळा टी-शर्ट) तरुणीवर हात उगारला. तरुणीनेही त्याला प्रत्युत्तर दिले. हे पाहून त्याच्यासोबत असणाऱ्या इतर तरुणांनी तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

nagpur fight
Video: नागपूरमध्ये मुलामुलींमध्ये राडा; पेट्र्रोल पंपावरील प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

नागपूर - शहरातील वाडी परिसरात तरुण-तरुणींच्या गटात झालेल्या धक्कादायक फ्री स्टाईल हाणामारीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. या घटनेत वाडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर काही तरुणांनी तरुणींच्या समुहाला जबर मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 10 मार्च म्हणजेच होळीच्या दिवशी घडली असून, पंपावर पेट्रोल भरताना वाहन नीट न लावल्याच्या मुद्द्यावरून हा राडा झाला आहे.

VIDEO : ...अन् पेट्रोल पंपावरच भिडले तरुण-तरुणी

हेही वाचा - मुंबईत बांगलादेशी मामा-भाच्याला अटक; ओळख लपवून शहरात होते वास्तव्य

पेट्रोल पंपावर अश्लील शेरेबाजी केल्यामुळे तरुणीने समोर येऊन तरुणाला जाब विचारला. तेव्हा मद्यपान केलेल्या तरुणाने (पिवळा टी-शर्ट) तरुणीवर हात उगारला. तरुणीनेही त्याला प्रत्युत्तर दिले. हे पाहून त्याच्यासोबत असणाऱ्या इतर तरुणांनी तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एवढेच नाही तर तरुणीला खाली पाडूनही मारहाण केली. मुलीसोबत असणाऱ्या इतर तरुणींनी बचावासाठी पेट्रोल पंपावरील आग विझवण्याचे सिलेंडर हातात घेऊन मारहाण करणाऱ्या तरुणावर हल्ला केला. मात्र, संख्येने जास्त असलेल्या तरुणांनी त्याच सिलिंडरने तरुणींना मारहाण केली.

तरुण तरुणींच्या गटात झालेली ही फ्री स्टाईल तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी या घटनेत जखमी तरुणीच्या तक्रारीवरून हल्लेखोर तरुणांवर मारहाण, विनयभंग यांसारखे गुन्हे नोंदवून दोघांना अटक केली आहे, तर एक जण फरार आहे.

Last Updated : Mar 15, 2020, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.