नागपूर - काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणूकीत मदत न केल्यामुळे मारहाण केल्याची तक्रार मॉन्टी मुरकुटे या तरूणाने केली. मॉन्टीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी बंटी शेळके विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालेला व्हिडीओ नागपूरमध्ये व्हायरल झाला आहे.
बंटी शेळके नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा नगरसेवक आहे. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदीही शेळके आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेळकेने काँग्रेसकडून मध्य नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, अत्यंत कमी मताच्या फरकाने त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा - महिला सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांचा मदतीचा हात, राबविणार 'होम ड्रॉप' उपक्रम
विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे बंटी शेळकेने धमकी देवून माराहाण केल्याचा आरोप मॉन्टी मुटकुरे या तरुणाने केला आहे. ही संपूर्ण घटना रस्त्याच्याकडेला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. यात बंटी शेळके रागाच्या भरात मॉन्टीची कॉलर पकडून त्याला ओढून नेताना दिसत आहे.