नागपूर : आपल्याला देश आणि शेतकरी वाचवायचे असतील तर सरकारच्या विरोधात लढा द्यावा लागेल. आपल्याला आंदोलन सोडायचे नाही. आंदोलना शिवाय पर्याय नाही असे टिकेत यांनी सांगितले. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन कमकुवत जरी दिसते असले तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन मजबूत करण्यास केव्हाही बोलवा आम्ही येऊ असे टिकैत म्हणाले. शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागपूरच्या इशाऱ्यांवर चालते सरकार : सरकार शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचे कारस्थान नागपुरातून रचण्यात आले अशी टीका टिकेत यांनी केली. लोकांची विचारसरणी बदण्याचे काम केले जाते आह. 40 टक्के लोकांना शेतापासून दूर करण्याचा विचार या सरकारचा आहे. स्वस्त लेबर मिळावे म्हणून लेबर ऍक्ट मध्ये बदल केले. अनेक कायद्यात संशोधन केले जात आहे. शेतकऱ्यांची जमीन मोठ्या उद्योगपतीना जमिनी देण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप राकेश टिकेत यांनी केला आहे. भारतात अन्न धान्य उत्पादित होऊ नये यासाठी मोठ्या कंपनी कार्यरत आहे. हा देश कृषी आणि ऋषींचा आहे, कृषी सोबत छेडखाणी कराल तर आंदोलन होणारच, देश आंदोलनाने वाचेल, राजकीय पक्ष तर विकायचा बसला आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागेल असे देखील ते म्हणाले
हमीभावाचा कायदा अजूनही झालेला नाही : दिल्लीत एक आंदोलन झाले. काळे शेतकरी कायदे मागे घेतल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पण, म्हणून सर्व मागण्या पूर्ण झाल्या असे नाही. हमीभावाचा कायदा अजूनही झालेला नाही. हे लक्षात घेता नव्या आंदोलनासाठी तयार राहा असे आवाहन शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी येथे केले. बहुजन संघष समितीतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला किसान संघर्ष समितीचे सुनीलम, नागेश चौधरी आदी उपस्थित होते.
न्यायव्यवस्था न मानणारे सरकार : सत्तेसाठी काहीही करणारे हे सरकार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेशात निवडून आलेली सरकारे दहशतीच्या जोरावर बदलली. आम्ही अराजकीय लोक आहोत. आम्ही लोकांना सतर्क करण्याचे काम करत आहोत. ज्या देशात विपक्ष कमजोर होतो त्या देशात तानाशाहचा जन्म होतो. शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचे षडयंत्र नागपूरच्या धर्तीतुन रचले गेले.