ETV Bharat / state

आता तुमच्या मुलांवर लक्ष ठेवणे झाले सोपे; नागपुरातील इंजिनिअरने शोधले विशेष 'ओळखपत्र' - आयटी इंजिनिअर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच विद्यार्थींनीची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते. पालकांना आपल्या मुलीच्या सुरक्षेची चिंता सतावत असते. त्यासाठीच इंजिनिअर हरीश अडतीया याने ओळखपत्रासारखे डिव्हाईस तयार केले आहे.

ओळखपत्र
author img

By

Published : Jul 3, 2019, 8:59 PM IST

नागपूर - आपला पाल्य वाईट संगतीत तर सापडला नसेल ना? अशी भिती प्रत्येक पालकाला असते. त्यासाठी नागपुरातील एका आयटी इंजिनिअरने आगळे-वेगळे ओळखपत्र शोधून काढले आहे. त्यामाध्यमातून पालक आपला पाल्य कुठल्या परिसरात आहे? यासह त्याच्या आवाजाचे परिक्षण करू शकणार आहेत.

विशेष ओळखपत्र शोधणाऱ्या इंजिनिअरसोबत चर्चा करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

सध्याचे जग आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण शोध लावले जात आहे. मात्र, या जगात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच विद्यार्थींनीची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते. पालकांना आपल्या मुलीच्या सुरक्षेची चिंता सतावत असते. त्यासाठीच इंजिनिअर हरीश अडतीया याने ओळखपत्रासारखे डिव्हाईस तयार केले आहे.

नेमके कसे आहे हे ओळखपत्र?

ओळखपत्र डिजीटल असून त्यामध्ये जीआरएस सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. या ओळखपत्राला एक बटन आहे. तुमचा पाल्य अडचणीत असल्यास ते बटन दाबताच तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. तो कुठल्या परिसरात आहे? हे देखील तुम्हाला समजेल. या ओळखपत्रामध्ये एका सिमकार्डचा सुद्धा वापर करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून एकेरी संवाद होईल. तुम्ही त्यावर फोन करून त्याठिकाणी काय सुरू आहे? आजूबाजूला काही आवाज आहे का? हे समजेल. त्यावरून आपला पाल्य अडचणीत तर नाही ना? याची माहिती तुम्हाला मिळेल. विशेष म्हणजे एकेरी संवाद होणार असल्याने समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज जाणार नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला न माहिती होता तुमच्या पाल्याला वाचवता येईल.

सुरक्षेच्यादृष्टीने या ओळखपत्राचा फायदा होईल. मात्र, शाळेच्या माध्यमातून किंवा पालकांनी स्वतः त्याचा चांगला उपयोग केला तरच हे ओळखपत्र फायदेशीर ठरणार आहे.

Intro:मनाने चंचल आणि उनाड विद्यार्थी केव्हा वाईट संगतीत सापडतील याचा नेम नसल्याने त्याचे पालक नेहमीच चिंतीत रहातात....दर दिवसाला आपल्या पाल्याची दिनचर्या कशी आहे हे जाऊन घेताना त्यांची दमछाक होते,पण तो वाया जाऊ नये या करिता सर्वच पालक आपल्या जीवाचे रान करत असताना त्यांचे वैयक्तिक जीवन देखील प्रभावित होत,यावर उपाय शोधण्यासाठी नागपुरातील तरुण नागपुरातील आयटी इंजिनिअरने तयार केला आगळा-वेगळा आयडेंटिटी कार्ड डिव्हाईस ,ज्याच्या माध्यमातून पाल्याचे लोकेशन सह तो कुठल्या परिसरात आहे त्याचे व्हॉइस मॉनिटरिंग सुद्धा करता येणार आहे Body:साध्याच जग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्याने प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण शोध लावले जातात आहे...आपल्या देशात शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय...त्यातल्या त्यात पालकांना विद्यार्थिनींची चिंता नेहमी सतावत असल्यानेच नागपुरातील आयटी प्रोफेशनल हरीश अडतीया यांने आयडेंटिटी कार्ड सारखे दिसणारे डिव्हाईस डिजाईन तयार केले आहे.... हे आय कार्ड डिजिटल असून जीपीआरएस सिस्टम चा यात वापर करण्यात आला ... या कार्डच्या बाजूला जे बटन दिसत आहे ते एस ओ एस बटन आहे तुमचा पाल्य अडचणीत असेल आणि त्याने ती बटन दाबताच तुमच्या मोबाईल वर मेसेज येईल .... तो कुठल्या लोकेशनवर आहे ते लोकेशन येईल ... यात दुसरी सुविधा म्हणजे यात एका सिमकार्डचा सुद्धा वापर करण्यात आला असून त्या माध्यमातून वन वे कॅम्युनिकेशन होईल तुम्ही त्यावर फोन करून तिथे काय सुरु आहे आजूबाजूला काही आवाज आहे का हे तुम्हाला ऐकता येईल आणि त्यावरून काही अडचण तर नाही ना याची माहिती तुम्हाला मिळू शकेल .. खास म्हणजे या कार्ड मध्ये कुठलाही आवाज येणार नसल्याने त्याची माहिती इतरांना मिळणार नाही ... सुरक्षेच्या दृष्टीने हे कार्ड उपयुक्त असलं तरी त्याचा वापर शाळा किंवा खाजगी रूपाने केला तरच त्याचा फायदा होईल ... हे कार्ड बनविणारे आय ती क्षेत्रात काम करणाऱ्या हरीश अडतिया यांचा काय उद्देश आहे त्यांच्या कडून जाणून घेतलं Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.