ETV Bharat / state

नागपुरात नशा करणाऱ्या तरुणाने केली भिकाऱ्याची हत्या - नशा करणाऱ्या तरुणांने केली

कमाल चाैकाजवळ भरणाऱ्या भाजीबाजार बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी या परिसरात अंधारात नशा केला जातो. याच भागात कचरा वेचून जगणारा बोरकर नामक भिकारी आणि भुऱ्या हे दोघेही एकमेकास ओळखत होते. दोघेही सोबत बसून नशा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास दोघांनी नशा केला. यावेळी दोघात शिवीगाळ केल्याने वाद झाला मारहाण झाली. यात भुऱ्याने दगड उचलून डोक्यावर टाकला. यात बोरकर नामक भिकारी हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पाचपावली पोलीस
पाचपावली पोलीस
author img

By

Published : Jun 8, 2021, 9:09 PM IST

Updated : Jun 8, 2021, 10:31 PM IST

नागपूर - पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत कमाल चौक भाजीबाजार परिसरात शिवीगाळच्या कारणावरून झालेल्या वादात एका नशा केलेल्या व्यक्तीने भिकाऱ्याची हत्या केल्याची घटना सोमवारी (आज) घडली आहे. रात्री नशेत दोघांमध्ये शिवीगाळ आणि नंतर वाद झाला. याचवेळी रागात डोक्यावर दगड घातल्याने भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यात मृतकाचे आडनाव बोरकर असल्याची माहिती आहे. तर अटक केलेल्या आरोपीचे नाव भुर्या उर्फ सोनू वल्द अब्दुल शकुर असे आहे. कमाल चाैकाजवळ भरणाऱ्या भाजीबाजार बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी या परिसरात अंधारात नशा केला जातो. याच भागात कचरा वेचून जगणारा बोरकर नामक भिकारी आणि भुऱ्या हे दोघेही एकमेकास ओळखत होते. दोघेही सोबत बसून नशा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास दोघांनी नशा केला. यावेळी दोघात शिवीगाळ केल्याने वाद झाला मारहाण झाली. यात भुऱ्याने दगड उचलून डोक्यावर टाकला. यात बोरकर नामक भिकारी हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

नशा करणाऱ्या तरुणाने केली भिकाऱ्याची हत्या

आरोपीने पंक्चरच्या ट्यूबचा केला होता नशा

यात टायरट्यूब पंक्चर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्यूब जो पंक्चर चिपकवण्यासाठी वापरला जातो. तो ट्यूब अगदी सहज मिळून जात असून त्या ट्यूबला कापडावर टाकून नाकाने सुगंध घेतात. यातील पदार्थमुळे उग्र वास येतो. याच ट्युबची नशा दोघेही सोबत करत असल्याचे सांगितले जात आहे. याच नशेत झालेल्या वादात ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याची माहिती पाचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -औरंगाबाद : गंगापूरमध्ये गावठी कट्ट्यासह एकाला अटक

Last Updated : Jun 8, 2021, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.