नागपूर : नैरोबी, केनिया येथून शारजाह, UAE मार्गे नागपुरात आलेल्या एका भारतीय नागरिकाकडून अॅम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ जप्त करण्यात आला आहे. महसूल, गुप्तचर संचालनालय नागपूरच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी 3 किलो 7 ग्रॅमचा अॅम्फेटामाइन प्रकारच्या पदार्थावर कारवाई केली आहे. या पदार्थाची किंमत 24 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे.
प्रवाशाला अटक : शारजाहून एअर अरेबियाच्या G9-415 या विमानाने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या सामानात हा पदार्थ आढळून आला आहे. प्रवाशाच्या सामानातील आयताकृती कार्टन बॉक्समध्ये पॅक केलेल्या काही वस्तू लपवून ठेवल्याचे तपासात आढळूले आहे. या वस्तूंमध्ये अॅम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ आढळून आल्याने प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
अॅम्फेटामाइन व्यापार प्रतिबंधित : अॅम्फेटामाइन हा सायकोट्रॉपिक पदार्थ आहे. ज्याचा अंमली पदार्थ, सायकोट्रॉपिक कायदा, 1985 च्या अनुसूची अंतर्गत समावेश होतो. या पदार्थाच्या व्यापारावर देशात प्रतिबंध घालण्यात आला आहे.
आरोपीला डीआरआय कोठडीत : आरोपीला अॅम्फेटामाइनची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले, असता न्यायालयाने आरोपीला डीआरआय कोठडी सुनावली. त्यानंतर दुसऱ्या एका नायजेरियन नागरिकाला पश्चिम दिल्लीतील सुभाषनगर येथून या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सिंडिकेटकडून नवीन, लहान विमानतळाचा वापर : अॅम्फेटामाइन प्रकारचा पदार्थाचा वापर अत्यंत व्यसनाधीन उत्तेजक पदार्थ केला जातो. त्यामुळे अशा आरोपींकडून वेगवेळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. नागपूरसारख्या छोट्या विमानतळावरून यांची तस्करी करणं सोपं जात असल्याने आरोपी लहान विमानतळाचा वापर करतात.
हेही वाचा -