ETV Bharat / state

लसीकरणासाठी वर्गणी गोळा करु नये; केंद्र व राज्य शासनातर्फे लस मोफत - vaccination is free said nagpur divisional commissioner

नागपूर विभागात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 45 वर्षावरील नागरिकांना तसेच कोविन ॲपवरील नोंदणी केल्यानंतर 18 वर्षावरील नागरिकांना नि:शुल्क लस देण्यात येत आहे. यासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या केंद्रावर कुठेही शुल्क आकारण्यात येत नाही. लसीकरणासाठी कोणीही निधी गोळा करू नये, असे आवाहन यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

nagpur vaccination meeting
नागपूर कोरोना लस बैठक
author img

By

Published : May 10, 2021, 10:50 PM IST

नागपूर - नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून विविध केंद्रामधून मोफत करण्यात येत आहे. लसीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा इतर कोणत्याही खासगी संस्थांनी निधी गोळा करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

नागपूर विभागात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 45 वर्षावरील नागरिकांना तसेच कोविन ॲपवरील नोंदणी केल्यानंतर 18 वर्षावरील नागरिकांना नि:शुल्क लस देण्यात येत आहे. यासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या केंद्रावर कुठेही शुल्क आकारण्यात येत नाही. लसीकरणासाठी कोणीही निधी गोळा करू नये, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे. कोरोनाबाधित तसेच इतर रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध नोंदणीकृत संस्था, सामाजिक संस्था, खासगी तसेच नोंदणीकृती आस्थापनाकडून आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. अशा कामासाठी गोळा केलेला निधी खर्च करता येऊ शकतो. मात्र, लसीकरणासाठी अथवा लस खरेदीसाठी निधी गोळा करू नये. यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे लस उपलब्ध करुन देण्यात असल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 1794 नवे रुग्ण, 74 रुग्णांचा मृत्यू

महापौरांनी केले होते मदतीचे आवाहन -

संपूर्ण नागपुरकरांचे सुरळीत लसीकरण व्हावे, यासाठी लस खरेदीसाठी निधीच्या संकलनासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक यांना विनंती करण्यात आली असल्याचे सुद्धा महापौरांनी सांगितले होते. शहरातील सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विकास निधीतून 10 लाख रुपये तसेच इच्छूक नगरसेवकांनी आपल्या मानधनातील काही निधी लस खरेदी करण्यासाठी ‘महापौर सहायता निधी’मध्ये देण्यासाठी पत्र द्यावे. सर्व नगरसेवकांनी स्वेच्छेने विकास निधी अथवा अन्य निधीमधून 10 लाख रुपये दिल्यास लस खरेदी करण्यासाठी मनपाकडे 15 कोटी रुपयांची व्यवस्था होईल, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले होते.

याशिवाय शहरातील सर्व खासदार यांनी त्यांच्या खासदार निधीतून रुपये दोन कोटी तर आमदारांनी आमदार निधीतून रुपये एक कोटी चे सहकार्य करण्याबाबत पत्र देण्यात आले. शहरातील सर्व खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांनी निधी दिल्यास त्यातून पुन्हा 15 कोटी रुपयांची व्यवस्था होऊ शकेल. सगळी निधी मिळून 10 लाख लोकांच्या लसीकरणाची व्यवस्था नागपूर महानगरपालिका करू शकणार आहे. याशिवाय नागपूर शहरातील उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींनी त्याचा सीएसआर निधी लस खरेदी करण्यासाठी द्यावा, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले होते.

हेही वाचा - कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.