ETV Bharat / state

Dhirendra Krishna Shastri In Nagpur : धीरेंद्र कृष्णशास्त्री नागपुरात येणार; श्याम मानवांचे आव्हान स्वीकारणार - Dhirendra Krishna Shastri In Nagpur

कथाकार धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी केलेल्या चमत्कारीक दाव्यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आव्हान दिले असून बाबांनी हे आव्हान स्वीकारावे असे आव्हान केले होते. मोठ्या वादानंतर या आव्हानाना सकारात्मक प्रतिसाद देत धीरेंद्र कृष्णशास्त्री नागपुरात येऊन हे आव्हान स्वीकारणार असल्याची माहिती मीडिया सुत्रांनी दिली आहे. या वादाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

Dhirendra Krishna Shastri In Nagpur
धीरेंद्र कृष्णशास्त्री
author img

By

Published : Jan 19, 2023, 6:21 PM IST

नागपूर : धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. आता पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रीं यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन स्वीकारले. रायपूर छत्तीसगड मध्ये 20 आणि 21 जानेवारीला बागेश्वर धामकडून दिव्य दरबार भरवला जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. तर नागपुरच्या रेशीमबाग मैदानावर सात दिवसच रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. कथा पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघालो. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वाद निर्माण केला. मी कथा सोडून पळालेलो नाही. मी तिथे होतो तेव्हा ते कार्यकर्ते का आले नाहीत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

बाबांवर आरोप काय? : मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारताचं नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. नागपुरात रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे केली आहे. तर श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आवाहन दिले आहे. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ. त्यांचे आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकार केले आहे.

कथेला भक्तांची गर्दी : गेल्या आठवड्यात ५ ते १३ जानेवारी दरम्यान नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर बागेश्वर धामचे कथाकार धीरेंद्र कृष्णशास्त्री यांच्या रामकथा पाठचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा मुक्काम नागपुरात नऊ दिवस होता असे सांगण्यात आले होते. त्यांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी देशाच्या अनेक भागातून लोक आले होते.

काय आहे समजूत? : धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांचे मन वाचत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामच्या दैवी दरबारात एकदा अर्ज केला की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे. महाराज लोकांच्या समस्या त्यांना न सांगता वाचून घेतात आणि नंतर त्यांचे मन सांगतात आणि लवकरच तुमची समस्या दूर होईल असे कागदावर सोडवतात. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात असलेले बागेश्वर धाम सरकार हे सिद्ध स्थान देशभर प्रसिद्ध झाले आहे. मोठ्या संख्येने लोक बागेश्वर धामच्या दरबारात पोहोचून अर्ज करतात. पण बाबांना लोकांचे मन कसे कळणार हा मोठा प्रश्न आहे.

इथून पेटला वाद : रामकथा सुरू असताना धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी अनेकांना त्यांच्या व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यानंतर त्या व्यक्तीने काहीही सांगण्याच्यापूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी व्यासपीठावर आलेल्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या आणि प्रश्न एका कागदावर लिहून काढल्या इथूनच खरा वाद सुरू झाला. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला असा आरोप श्याम मानव आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. श्याम मानव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर न देताचं पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्रीचा निर्धारित दौरा नऊ दिवसांच्या होता तो दोन दिवस आधीच गुंडाळून नागपुरातुन काढता पाय घेतला असे आरोप सुरू झाले.

हेही वाचा : Scoot Airline News : सिंगापूरला जाणारे विमान ३५ प्रवाशांना चुकवून अमृतसर विमानतळावरून रवाना; डीजीसीएचे चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.