ETV Bharat / state

Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी कॉल प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा, म्हणाले...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकीचा कॉल आला होता. आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला आहे. तत्काळ तो कॉल ट्रेस करून गुन्हा दाखल केला असल्याची माहिती माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कॉल करणारा आरोपी बेळगावच्या जेलमधून कॉल करत होता, आरोपीने मोबाईल मिळवून हे कॉल केले आहे. त्यामागे त्याचा हेतू काय आणि त्याच्या पाठीमागे आणखी कोणी आहे का याची पडताळणी पोलीस विभाग करेल. जेलमध्ये फोन कसा केला याचा तपास कर्नाटक सरकार करत आहे, ते कारवाई करतील असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 15, 2023, 8:48 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात माध्यमांसोबत बोलताना

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गडकरींना जो धमकीचा कॉल आला, तो आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला आहे. तत्काळ तो कॉल ट्रेस करून गुन्हा दाखल केला आहे. कॉल करणारा आरोपी बेळगावच्या जेल मधून कॉल करत होता, तिथे त्याने मोबाईल मिळवून हे कॉल केले आहेत. त्यामागे त्याचा हेतू काय आणि त्याच्या पाठीमागे आणखी कोणी आहे का? याची पडताळणी पोलीस विभाग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कुख्यात गुंडाचा समावेश : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणी कुख्यात गुंड जयेश कांथाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. जयेश कांथावर कारागृहातुन पळून जाण्याचा गुन्हा दाखल असून खंडणी मगितल्याचा जुना रेकॉर्ड आहे. नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला पोहचले आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीकडून डायरी जप्त केली आहे, त्यात कोणाचे नंबर आहे याचा तपास सुरू आहे. ज्या मोबाईलवरून धमकीचे कॉल आले तो मोबाईल कारागृहात असल्याने त्या संदर्भात बेळगावात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तपास सध्या प्राथमिक पातळीवर आहे, आरोपीला फाशीची शिक्षा भोगत असल्याने कायदेशीर प्रक्रिया करून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

संपर्क कार्यालयात धमकीचा फोन : नितीन गडकरी यांचे नागपूरातील खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात फोन आला. त्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्या तासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच, दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

एका तासात तीन कॉल: नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजताच्या पहिला फोन आला. त्यानंतर साडे बारा वाजताच्या दरम्यान आणखी दोन फोन आले. पलीकडून बोलणा-या व्यक्तीने दाऊद ईब्राहिमचा हस्तक असल्याचे बोलत असल्याचे सांगितले. यावेळी आरोपीने नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात भारतीय जनता पक्षातील नेत्यांना माहिती मिळताच त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. स्थानिक पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाच्या पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाले आहेत.

पोलीस बंदोबस्त वाढवला: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वानपथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.