नागपूर : भारतात स्वातंत्र्यानंतर 14 वे राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी आपल्या नेत्यांनी असे संबोधले होते की, 14 वे रत्न जन्माला आले आहे. त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती देशाने पाहिली आहे. एकूण जीडीपीच्या 15 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. 30 टक्के गुंतवणूक राज्यात येते. महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. त्यामुळेच पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितले गेले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत : 9 महिन्यांपूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार आले आहे, या सरकारच्या माध्यमातून अनेक नव्या योजना आणण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर निसर्गामुळे अडचणी निर्माण होत आहेत. शेतकरी सन्मान योजना सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतिने सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहेत. एकूण 21 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहोत. शेतकऱ्यांना मदतीसाठी विविध योजना आखल्या आहेत. 8 वस्तूंची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. केवळ 1 रुपयात विमा मिळणार आहे. यावेळी नुकसान झाल्यावर 12 हजार कोटी शेतकऱ्यांना मदत दिली आहे, सर्वात मोठी मदत शेतकऱ्यांना दिले आहेत.
घरे बांधण्याचा निर्णय : जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमानात करावी लागेल. जलसंधारणमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला. जलयुक्त शिवारमध्ये नवे गावे घ्यायची आहे. शेतीचे नुकसान होणार नाही, यासाठी मोठी मोहीम उद्यापासून करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावर्षी 10 लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 3 लाख ओबीसींकरिता, सगळ्यांकरिता घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. दवाखानाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातही दवाखान्याचे उदघाटन होत आहे. गरीब माणसाला यामुळे मोठी सोय मिळेल.
राज्याची अर्थव्यवस्था ट्रेलियन डॉलर : नागपूर शहराच्या दृष्टीने मेडकील आणि मेयोसाठी 300 कोटींचा रिकसन्ट्रक्शनचा प्रकल्प हाती घेतला आहे. ऍग्रो सेंटर, रस्ते, ग्रामीण रस्त्यांसाठी निधी दिला आहे. पिण्याच्या पाण्याची योजना, सिंचन प्रकल्प भरीव निधी नागपूर जिल्ह्यासाठी दिला आहे. महाराष्ट्र हा प्रगतिशील आहे. ट्रेलियन डॉलरपर्यंत महाराष्ट्राला न्यायचे आहे, सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राला पुढे द्यायचे आहे.
गडचिरोलीचा विकास करू : आमचे सी-60 जवान आणि सैन्य सातत्याने मोठे शौर्य दाखवत आहेत. आम्ही गडचिरोलीचा विकास करू शकतो. आज मी तिकडे जात आहे. मी दक्षिण आणि उत्तर दोन्ही भागात जाईन आणि तिथेच राहीन. महाराष्ट्र पोलिसांच्या सी 60 दलाने गडचिरोलीमध्ये तीन नक्षल समर्थकांना चकमकीत ठार केले. या कृतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या जनेतला शुभेच्छा दिल्या आहेत. करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.