ETV Bharat / state

'गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी?' -

गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना मानतो, ही कसली सौदेबाजी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. आम्ही गांधी-नेहरुंना मानतो. तुम्हीही सावरकरांचा आदर करा, असे वक्तव्य राऊत यांनी राहुल गांधींना उद्देशुन केले होते.

Devendra Fadnavis critisim on sanjay raut in nagpur
फडणवीसांची संजय राऊतांवर टीका
author img

By

Published : Dec 15, 2019, 1:57 PM IST

Updated : Dec 15, 2019, 3:31 PM IST

नागपूर - गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. आम्ही गांधी-नेहरुंना मानतो. तुम्हीही सावरकरांचा आदर करा, असे वक्तव्य राऊत यांनी राहुल गांधींना उद्देशुन केले होते. सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्य दुर्दैवी आहे. सावरकर त्यांना ठावून नाहीत. देशभर याचा निषेध होत आहे. केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. त्यामुळे शिवसेनेने किती दिवस लाचारी करायची याचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीसांची सेनेवर टीका
राहुल गांधींनी या संदर्भात जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. देशभर ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. जोवर माफी मागत नाहीत, तोवर ही आंदोलने सुरूच राहतील. राहुल गांधींना इतिहास माहीत नाही, तो त्यांनी आधी अभ्यासावा, असेही ते म्हणाले. राहुल गांधींना सावरकर यांची महती काय माहीत? त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असेही फडणवीस म्हणाले.

Intro:Body:

'गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना मानतो, ही कसली सौदेबाजी?'

नागपूर - गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना मानतो, ही कसली सौदेबाजी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. आम्ही गांधी-नेहरुंना मानतो. तुम्हीही सावरकरांचा आदर करा, असे वक्तव्य राऊत यांनी राहुल गांधींना उद्देशुन केले होते. सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्य दुर्दैवी आहे. सावरकर त्यांना ठावून नाहीत. देशभर याचा निषेध होत आहे. केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. त्यामुळे शिवसेनेने किती दिवस लाचारी करायची याचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. 

राहुल गांधींनी या संदर्भात जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. देशभर ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. जोवर माफी मागत नाहीत, तोवर ही आंदोलने सुरूच राहतील. राहुल गांधींना इतिहास माहित नाही, तो त्यांनी आधी अभ्यासावा, असेही ते म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Dec 15, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.