ETV Bharat / state

Devendra Fadvanis on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले... - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत देशाला दिशा देणाऱ्या संवैधानिक मुल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेऊन जाऊया, असा विश्वास आज उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमृतकाळात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेत सर्व सामान्यांना सहभागी करून पुढे घेऊन जाण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपुरच्या कस्तुरचंद पार्कवर आयोजित भारतीय प्रजासत्तादिनाच्या ७३व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

Devendra Fadvanis In Republic Day Nagpur
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 26, 2023, 6:30 PM IST

उपमुख्यमंत्री प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेले संविधान हे सर्वोच्च स्थानी असून संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत देश विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमान असलेल्या संविधानातील मुल्यांचा अंगीकार करून महाराष्ट्र आणि देशाचा विकास करूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्रातही अमृतकाल साजरा होत आहे. या निमित्ताने राज्य शासनाने विकास यात्रा आरंभिली आहे. देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून देशाच्या एकूण निर्यातीतही २२ टक्के हिस्सा आहे. राज्यातील प्रत्येक घटकांचा या विकास यात्रेत सहभाग करून घेत महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Devendra Fadvanis In Republic Day Nagpur
मानवंदना स्वीकारताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उज्ज्वल परंपरा पुढे घेऊन जाऊया: नागपूर ही परिवर्तनाची भूमी आहे. शहराचा हा उज्ज्वल वारसा पुढे घेऊन जाण्यात प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन फडणवीसांनी केले. येत्या मार्च महिन्यात 'जी-२० परिषदे'चे आयोजन नागपूर शहरात होत आहे. या निमित्ताने परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना सुंदर व संपन्न नागपूरचे दर्शन घडविण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरामध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने पार पडलेली राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस आणि राष्ट्रीय फार्मास्युटीकल परिषद हे आयोजन शहराचा मान वाढविणारी ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.

कस्तुरचंद पार्कवर झालेले अश्व पथकाचे संचलन

पथकांची मानवंदना स्वीकारली: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पोलीस, होगगार्ड, छात्रसेना, स्काऊटगाईड आदी १७ पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या नेतृत्वात या सर्व पथकांनी मुख्य मंचासमोरून पथ संचलन केले. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली. अश्वदल, श्वानपथक आणि अग्निशमन दलाचेही पथसंचलन झाले. जिल्हा क्रीडा परिषदेचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला. विद्यार्थ्यांनी या चित्ररथावर मल्लखांबासह योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केली. हे पाहण्यासाठी नागपुरकरांनी एकच गर्दी केली होती. प्रशासनाच्या या उत्कृष्ट प्रदर्शनाचे नागरिकांनी भरभरून कौतुकसुद्धा केले.

हेही वाचा : Sneha Kokane Criticized Dr Kayande : याला नंगानाच म्हणत नाही, बॉडी बिल्डर स्नेहा कोकणेंनी कायंदेंना सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.