ETV Bharat / state

Vijay Wadettiwar Appeals : निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा... अजित पवारांनी तीच धमक आता दाखवावी - विजय वडेट्टीवार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Vijay Wadettiwar Appeals : महाविकास आघाडीमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होता. तीच धमक आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखवावी. (Assembly Opposition Leader) निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? (Development Fund ) असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विचारलायं. संजय राऊत म्हणतात त्या प्रमाणे ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत. आता दादागिरी ते दाखवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Vijay Wadettiwar Appeals
विजय वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 5:10 PM IST

निधीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला

नागपूर Vijay Wadettiwar Appeals : विजय वडेट्टीवार आज (सोमवारी) उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार बरसले. ते म्हणाले की, अजित पवार कधी खुश राहिले आहेत का? ते नेहमीच नाराज असतात. (Deputy CM Ajit Pawar) त्यांच्या मनाप्रमाणे झालं तर ते खुश आणि मनाविरुद्ध झालं तर नाराज हे समीकरण पक्कं आहे. 'हम करे सो कायदा' अशी त्यांची भूमिका आहे. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये त्यांना वाटू लागलंय, निधी मिळतो की नाही; पण तिजोरीच्या चाव्या या तुमच्याकडे आहेत. तरी निधीसाठी का रडता, असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी पवारांना विचारला. (Vijay Wadettiwar Taunts Ajit Pawar)

म्हणून अजित पवारांवर रडण्याची वेळ : अजित पवारांनी दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे गटाची तक्रार केली. तक्रारी पुरतचं दादांना मर्यादित ठेवा. आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली आहे. कारण भाजपामध्ये जाणाऱ्यांना ते रडवून रडवून सडवतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला.

सरकारचे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष : ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या बाबतीत सरकारची भूमिका उदासीन आहे. ओबीसीच्या मतांवर निवडून यायचं आणि प्रश्न सोडवायचे नाही अशीच सरकारची भूमिका आहे. एकनाथ शिंदे सरकारनं ओबीसी समाजाचे, विद्यार्थ्यांचे कोणतेही प्रश्न अद्यापही सोडवले नाहीत. ओबीसी विखुरलेला आहे. तो एक होऊ शकत नाही, असा विचार करून सरकार ओबीसींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.

अतुल लोंढे आणि नानाच सांगू शकतील : काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांचं बॅनर दक्षिण पश्चिम मतदारसंघात लागलं आहे. ते येथून लढण्यास इच्छुक आहेत का, असा प्रश्न विजय वडेट्टीवारांना विचारला असता ते म्हणाले की, याबद्दल नाना पटोले आणि अतुल लोंढे यांनाचं माहिती असेल. दोघांनी काही ठरवलं असेल, तर त्याबद्दल त्यांना विचारलं पाहिजे; मात्र आमच्या कानावर अशी कोणतीही माहिती नाही आणि उमेदवारी देण्याचा सध्या प्रश्न नाही. बॅनर लावलं म्हणून निवडणूक लढवणार असं नाही. फक्त दिवाळीच्या शुभेच्छाचंही बॅनर असू शकतं. अतुल लोंढे प्रदेशचे मुख्य प्रवक्ते असल्यामुळे प्रदेश अध्यक्षांना त्या संदर्भात माहीत असेल.

अजित पवारांना कमळाबाईचा आशीर्वाद : अजित पवारांना भाजपाच्या तिकिटावरच लढावं लागेल, असं मला एकंदरीत दिसतं आहे. कमळावर लढल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मी पूर्णपणे खात्रीनं सांगू शकतो की, अजित पवार गटाला कमळाबाईचा आशीर्वाद आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा:

  1. Vijay Wadettiwar Death Threat: विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहून 'ही' केली मागणी
  2. Sanjay Raut vs Nitesh Rane : नितेश राणे-संजय राऊत टीका करताना 'कमरेखाली' घसरले, काढली एकमेकांची 'अंतर्वस्त्र'
  3. Rohit Pawar On BJP : शरद पवारांच्या बनावट ओबीसी प्रमाणपत्रावरुन रोहित पवार काय म्हणाले, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.