ETV Bharat / state

K Chandrasekhar Rao Question : जे निर्णय तेलंगणात होऊ शकतात, मग महाराष्ट्रात का नाही - के. चंद्रशेखर राव - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव

महाराष्ट्राच्या या पावन भूमीला मी वंदन करतो, असे म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज (गुरुवारी) नागपुरात आयोजित भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्ता मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. शेतकरी आणि जनहित लक्षात घेऊन जे निर्णय तेलंगणात होऊ शकतात, मग महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न त्यांनी शिंदे-फडणीस सरकारला मंचावरून विचारला.

K Chandrasekhar Rao Question
के. चंद्रशेखर राव
author img

By

Published : Jun 15, 2023, 8:03 PM IST

नागपूर : आम्ही चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकले आहे. भारतातील पक्षांचे लक्ष आता केवळ निवडणूक जिंकणे झाले आहे. काहीही करून निवडणूक जिंकणे सुरू झाले आहे. हे लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे. निवडणुकीत जनता जिंकायला पाहिजे. देशात 42 टक्के शेतकरी आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जनता ही केवळ पाणी आणि वीज द्या एवढेच मागते आहे. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहेत. ज्या राज्यात अनेक नद्यांचा उगम होतो त्याच महाराष्ट्रात पाणी समस्या आहे. ७५ वर्षांचा हा कालावधी फार मोठा आहे. अनेकांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन निवडणूक लढली. आजही कांद्यासाठी यात्रा करावी लागते ही शोकांतिका आहे. जनतेचा विचार हा आपल्याला करावाच लागेल असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले आहेत.

देशाला नवीन जल धोरणांची गरज : आज आपल्याला जेवढे पाणी हवे आहे, त्यापेक्षा दुप्पट पाणी उपलब्ध आहे. पावसाचे पाणी नदीत वाहून जाते. 50 हजार टीएमसी पाणी समुद्रात जाते. एवढे नेते असून काहीच होत नाही. भारतात सर्वाधिक कृषी लायक भूमी आहे. अमेरिकेत 29 टक्के, चीनमध्ये 16 टक्के, भारतात 50 टक्के कृषी भूमी योग्य आहे. जेवढे पाणी उपलब्ध आहे, तेवढे प्रत्येक एकरात देऊ शकतो. उद्योगांसाठी देऊनही पाणी शिल्लक राही. देशात नवीन जलनिती आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे के. चंद्रशेखर राव म्हणाले आहेत.

तर महाराष्ट्रात का नाही? - देशात कोळसा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. पुढील दीडशे वर्षे देशाला पुरवू शकतो इतका कोळसा असताना मग लोकांना वीज का मिळत नाही? तेलंगणामध्ये आधी शेतकरी आत्महत्या व्ह्ययच्या. आज तेलंगणामध्ये २४ तास मोफत वीज मिळते. शेतकरी खुश आहे. शेतकरी आत्महत्या आम्ही रोखल्या. शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले सर्व पीक आम्ही विकत घेतो. असे देशातील कुठल्याही राज्यात होत नाही. कुणाकडून पाणीपट्टी कर घेत नाही. पाणी, वीज मोफत देतो. तेलंगणासारखे छोटे राज्य हे सर्व जनतेसाठी करू शकते तर महाराष्ट्र का नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी आमदार, खासदार होतील: आम्ही पूर्ण निवडणूक लढणार. आता आमदार, खासदार शेतकऱ्यांना बनायचे आहे. सर्वांना अन्न देणारा शेतकरी संसदेत कायदे देखील बनवू शकतो. याची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. केंद्र सरकार हे मान्य करते की देशात शेतकरी आत्महत्या होतात. धर्म, जात, लोकांमध्ये फूट टाकून ते केवळ निवडणूक जिंकायला लागले. यावर चर्चा करायला पाहिजे. चार लाख लोकं आमच्या पक्षात आले आहेत. मोठे नेते देखील आमच्याकडे पाहत आहेत. महाराष्ट्रातून सुरू झालेले हे पावले पुढे जातील, भारतात परिवर्तन होईल, मला विश्वास आहे, असे मत के. चंद्रशेखर राव यांनी भाषणातून मांडले.

हेही वाचा:

  1. Keshav Prasad Maurya : भाजपला घरचा आहेर, उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्र्यांची देशात महागाई वाढली असल्याची कबुली
  2. Bacchu Kadu News : आदिवासींची आमदार बच्चू कडू यांनी घेतली भेट, सुविधा पुनर्वसनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा
  3. Threat Case : संजय राऊत यांना धमकी देणारा निघाला निकटवर्तीय; मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक, कांजूरमार्ग पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.