नागपूर - ओव्हरफ्लो झालेल्या तलावाजवळ सेल्फी काढण्याच्या नादात काही तरुण तलावाच्या सरंक्षण भिंतीवर चढत आहेत. मकरधोकडा तलाव हा काठोकाठ भरल्याने त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. शेकडो पर्यटक तलावाच्या संरक्षण भिंतीजवळ गर्दी करत आहेत. फोटोची हौस भागविण्यासाठी संरक्षण भिंतीजवळ जात आहेत. मात्र, काही तरुण सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालत चक्क संरक्षण भिंतीवर चढत आहेत.
सेल्फी काढत असताना अशा पद्धतीने स्टंटबाजी केल्यास जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे. मकरधोकडा तलाव हा उमरेड पासून १२ किमी अंतरावर आहे. अनेक वर्षानंतर हा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांची इथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, याकडे प्रशासन आणि पोलिसाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर एखादी घटना घडून जीव जाण्याची शक्यता आहे.