ETV Bharat / state

नागपूर: अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान, वीज पडून दोघांचा मृत्यू - Nagpur District Latest News

काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मिरची या पिकांना मोठा फटका बसला आहे. मौदा सोबतच नरखेड, कलमेश्वर, सावनेर आणि उमरेड तालुक्यात सुद्धा अवकाळी पावसाने हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान
author img

By

Published : Feb 19, 2021, 3:08 PM IST

नागपूर - काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मिरची या पिकांना मोठा फटका बसला आहे. मौदा सोबतच नरखेड, कलमेश्वर, सावनेर आणि उमरेड तालुक्यात सुद्धा अवकाळी पावसाने हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे.

सलग दोन दिवस नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. नरखेड तालुक्यातील सिंजर आणि कुही तालुक्यातील पचखेडी येथे गारपीट झाली त्यामुळे हरभरा,गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. आज सुद्धा नागपूर शहरात ढगाळ वातावरण कायम असल्याने आज देखील पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस

वीज पडून दोघांचा मृत्यू

भिवापूर तालुक्यातील पेंढराबोडी आणि कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये सचिन रामाजी सहारे (३५) पेंढराबोडी आणि अमोल नारायण काखे (२५) ब्राह्मणी अशी मृतांची नावे आहेत. अमोल हा गुर चारण्याचे काम करत होता. तो नेहमीप्रमाणे ब्राह्मणी शिवारात गुरे चारत असताना, अचानक कडाक्याच्या विजासह पावसाला सुरुवात झाली. आणि याचवेळी वीज पडून त्याचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.