ETV Bharat / state

Dam Burst In Nagpur : नागपुरात फुटला खसाळा राख बंधारा; अनेक गावात शिरले पाणी - खसाळा

नागपुरात मागील काही दिवसांपासून संततधार पावसाने थैमान माजले आहे. गडचिरोडी मध्ये अनेक भागात नद्यांना पूर आला आहे. तर नागपुरातील ( Due to continuous rain in Nagpur ) कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा शनिवारी फुटला आहे. यामुळे अनेक गावात पाणी शिरले आहे. यामुळे शेतीसह गावाकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी गेले आहे. ( Rakh dam burst in nagpur )

Dam burst in Nagpur
नागपुरात बंधारा फुटला
author img

By

Published : Jul 16, 2022, 5:56 PM IST

Updated : Jul 16, 2022, 6:12 PM IST

नागपूर - नागपुरात संततधार पावसामुळे ( Due to continuous rain in Nagpur ) जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा फुटल्याने ( Rakh dam burst in nagpur ) मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. खसाळा राख बंध शनिवारी सकाळी कोसळे. त्यामुळे सर्व जोड रस्ते पाण्याने भरले होते.

जिल्हा परिषद सदस्यांची प्रतिक्रिया

अनेक गावांमध्ये पाणी शिरले - खसाळा, म्हसळा, कवठा, खैरी आदींसह परिसरातील गावांमध्ये फ्लाय राखेचे पाणी वाहत आहे. फ्लाय ऍशच्या पाण्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे लाखो टन राख वाहुन जात आहे. परिसरातील नदी, नाले प्रदूषित झाले आहे. सध्या दोन जेसीबीच्या मदतीने युद्धपातळीवर गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नागपूर शहरासह ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या पावसामुळे हा राखेचा तलाव फुटला. तलाव फुटल्याने परिसरातील असलेल्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.

  • #WATCH | Maharashtra: A part of Khasala Ash Bund of Koradi Thermal Power Plant in Nagpur collapsed owing to heavy rainfall, leading to the submerging of all nearby villages in its wastewater & damage to crops pic.twitter.com/kYIkn5pmuO

    — ANI (@ANI) July 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नुकसान भरपाईची मागणी - राख तलाव फुटल्यामुळे कोराडी लगतच्या गावातखसाळा, मसाला, कवठा, खैरी गावाला त्याचा फटका बसला आहे. या गावातील शेतीमध्ये हे राख युक्त पाणी शिरल्यामुळे शेतीच देखील मोठे नुकसान होणार आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांनी केली आहे. नागपूर शहरासह विदर्भात पाऊस बरसतो आहे. नागपूर शहरांमध्ये होत असलेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाणी दूषित - यातच मागच्या रविवारी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील फ्लाय एश कन्हान नदीमध्ये मिसळली असल्याने नागपुर शहराच्या पूर्व, उत्तर नागपुरकरांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. अशातच आज खसाळा एशबंड म्हणजेच राख साठवून केंद्र असल्या भागात सततच्या पावसाने या केमिकल युक्त राखीतपाणी भरले आहे. परिणामी राखेचा बांध फुटल्याने हे पाणी लगतच्या ओसंडून वाहत असलेल्या खैरी नाल्यात मिसळला. त्यामुळे जिकडे वाट मिळेल तिकडे पुराच्या पाण्यासोबत ही केमिकल युक्त राख मिसळल्याने पाणी दुषीत झाल्याचा धोका निर्माण झाला आहे.

Dam burst in Nagpur
नागपुरात बंधारा फुटला

कोराडी येथील वीज प्रकल्प, खापरखेडा येथील वीज प्रकल्प याच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये केमिकल युक्त राखीमुळे अगोदरचच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा फटका परिसरातील सुमारे 21 गावांना बसला आहे. एवढेच नाही तर हे पाणी पिल्याने येथील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यासह, श्वसनाचे त्रास, अंग खाजवणे, तसेच इतर आजारांनी त्रस्त आहे. या भागातील शेतीची उत्पादन क्षमता घटली आहे.

दरम्यान, या सगळ्या समस्या माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल आदित्य ठाकरे यांनी केली होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांना कारवाईची निर्देश दिले होते. वीज निर्मितीच्या अधिकाऱ्यांनी यापुढे कन्हान नदीत राख टाकली जाणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र, पहिल्याच पावसात एशबंड फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच नदीतील लाखो लिटर पाणी हे दूषित झाले आहे. माजी ऊर्जामंत्री तथा अमदार भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिसराची आज पाहणी केली.

हेही वाचा - Chhagan Bhujbal On CM Shinde : काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके...; छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

Last Updated : Jul 16, 2022, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.