ETV Bharat / state

'क्राइम कॅपिटल' नागपूर :  गतवर्षीच्या तुलनेत खून अन् बलात्काराच्या घटनेत वाढ - नागपूर क्राइम बातमी

संत्रा नगरी नागपूरची ओळख आता गुन्हेगारीची राजधानी बनत चालल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे.

नागपूर पोलीस
नागपूर पोलीस
author img

By

Published : Dec 19, 2020, 9:43 PM IST

Updated : Dec 19, 2020, 9:58 PM IST

नागपूर - राज्याची उपराजधानी नागपूर सध्या गुन्हेगारीची राजधानी बनत चालल्याचे चित्र होत आहे. वाढत्या खुनाच्या घटनांमुळे संत्रानगरीची ओळख रक्तरंजित शहर, अशी ओळख होत चालली आहे. नागपुरातील गुन्ह्यांचा चढता आलेख पाहता पोलिसांची गुन्हेगारांवरील पकड सैल झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

मागील सहा वर्षांपासून गृहमंत्र्यांचे शहर अशी ओळख

भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री व गृहमंत्री पद असलेले देवेंद्र फडणवीस व सध्याच्या म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरचेच असल्यामुळे मागील सहा वर्षांपासून गृहमंत्र्यांचे शहर, अशी ओळख नागपूरला मिळाली आहे.

हत्येबाबत नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर

मागील सहा वर्षांपासून नागपूरचे गृहमंत्री असतानाही हत्येच्या बाबतीत देशात नागपूरचा दुसरा क्रमांक ठरत आहे. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व पोलिसांचा गुन्हागारांवरील कमी झालेला दबाव या दोन्ही गोष्टींमुले नागपूर आता गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरत आहे.

कोरोनाकाळातही घडत होते गुन्हे

गत वर्षीच्या तुलनेत सुरू वर्षातील गुन्ह्याचा आलेख हा वाढता आहे. त्याच कोरोना तसेच पोलीस आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने पोलिसांची गुन्हेगारांवरील पकड सैल होत गेली. यामुळे कोरोनाकाळातही गुन्हे घडतच होते.

चोऱ्या कमी मात्र खुन अन् बलात्काराचे वाढले प्रमाण

गतवर्षी म्हणजे 2019 मध्ये नागपूर शहरात 84 खुनाच्या घटना घडल्या होत्या. मात्र, यावर्षी आतापर्यंत (डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत) 92 खूनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर गंभीर दुखापतीच्या घटनांमध्ये देखील वाढ झालेली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 75 होता तर यावर्षी गंभीर दुखापतीच्या घटनांनी शतक पूर्ण केले आहे. खूनाचा प्रयत्न झाल्याचे 101 गुन्हे नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. गेल्यावर्षी बलात्काराच्या 150 घटनांची नोंद पोलिसात झाली होती तर यावर्षी हा आकडा 160 पर्यंत पोहोचला आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरात 741 घरफोडीच्या घटना घडल्या होत्या तर यावर्षी हा आकडा 615 इतका झाला आहे. तर गतवर्षी विविध पोलीस ठाण्यांत 2 हजार 232 चोरीचे गुन्हे दाखल होते ते आता 1 हजार 838 वर पोहोचले आहे.

दिवसाढवळ्या खुनाच्या घटना वाढल्या

या वर्षभराच्या कार्यकाळात अनेक अशा घटना घडल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांची नाचक्की झाली आहे. यामध्ये भर चौकात बाल्या बिनेकरचा झालेला खून आणि त्यांनंतर व्हायरल झालेला व्हिडिओमुळे शहरात दहशत पसरली होती. या प्रकारच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. ज्याचे सीसीटीव्ही व्हायरल झाले होते. शहरात वाहनांची तोडफोड करण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. शिवाय महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबारातील आरोपींना शोधून काढण्यात पोलीस अपयशी ठरल्याने तो तपास देखील सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटल्याची चर्चा सुरू झाली होती. यावरुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते.

हेही वाचा - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो वैद्य यांचा संघ प्रवास..

हेही वाचा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो वैद्य यांचे नागपुरात निधन

Last Updated : Dec 19, 2020, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.