नागपूर - जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. गेल्या दिवसभरात तब्बल २४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६ हजार १४३ वर पोहोचली आहे.
या एकूण रुग्ण संख्येपैकी १ हजार ९०५ रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत. तर ४ हजार २३८ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या २४६ रुग्णांपैकी ६६ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर १८० रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. आत्तापर्यंत ३ हजार ७५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १४२ मृत रुग्ण हे जिल्ह्यातील आहेत तर ३५ मृत रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. मृतांमध्ये अमरावती आणि अकोला येथील रुग्णांचाही समावेश आहे.
सध्या नागपुरातील २२ ठिकाणी २२१७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६१.११ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा २.७९ इतका आहे