ETV Bharat / state

नागपुरात कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या डोसला सुरुवात; पुढील तीन दिवस चालणार प्रक्रिया - covaxin trial nagpur news

नागपुरात कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या डोसला सुरुवात झाली आहे. यात एकूण ५० व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. १२ ते १८ वयोगटातील ८ मुले, ६० ते ६५ वयोगटातील ५ नागरिक तसेच विविध वयोगटातील २२ महिला आणि १५ पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे.

नागपुरात कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या डोजला सुरुवात

author img

By

Published : Oct 6, 2020, 4:09 PM IST

नागपूर - कोरोना प्रतिबंधक लसीची सर्वांनाच आस लागली आहे. भारत बायोटेककडून संपूर्ण भारतात विविध ठिकाणी लसींबाबत संशोधन सुरू आहे. नागपुरातही गिल्लुरकर रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचे कार्य सुरू आहे. याच चाचणीतील दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या डोसला आज(मंगळवार)पासून सुरुवात झाली आहे. यात एकूण ५० स्वयंसेवकांना हा डोस दिला जाणार आहे. शिवाय पुढील तिन दिवस ह्या डोसची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सोबतच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लस येईल, अशी शक्यता डॉ. गिल्लुरकर यांनी वर्तवली आहे.

माहिती देताना डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर

कोरोनाने देशभरात उच्छाद मांडला असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता संपूर्ण भारताला आस लागली आहे ती कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची. याच पार्श्वभूमीवर भारतातील विविध ठिकाणी लसीची मानवी चाचणी केल्या जात आहेत. यात नागपुरातील गिल्लुरकर रुग्णालयाचाही समावेश आहे. येथे लस चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या डोसला सुरुवात झाली आहे. यात एकूण ५० व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. १२ ते १८ वयोगटातील ८ मुले, ६० ते ६५ वयोगटातील ५ नागरिक तसेच विविध वयोगटातील २२ महिला आणि १५ पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील डोसमधून सकारात्मक परिणाम निदर्शनास आल्याचे डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले आहे. शिवाय कोणताही दुष्परिणाम न जाणवल्याचेही डॉ. गिल्लुरकर म्हणाले. या टप्प्यात पुढील तीन दिवस लस दिली जाणार असून लवकरच तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचेही डॉ. गिल्लुरकर यांनी सांगितले आहे. शिवाय या सर्व सकारात्मक परिणामाच्या आधारावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लस विकसित होईल, अशी शक्यताही डॉ. गिल्लुरकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - हाथरस प्रकरण : नागपूरमध्ये काँग्रसकडून नोंदविला निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.