ETV Bharat / state

नागपुरात दाम्पत्त्याची मुलीसह वैनगंगा नदीत आत्महत्या

author img

By

Published : Feb 1, 2021, 7:44 AM IST

Updated : Feb 1, 2021, 9:17 AM IST

वैनगंगा नदीमध्ये मासेमारांच्या सतर्कतेमुळे तीन मृतदेह आढळले. एका दाम्पत्याने आपल्या अल्पवयीन मुलीसह आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

river
नदी

नागपूर - वैनगंगा नदी पात्रात एका दाम्पत्याने आपल्या मुलीसह आत्महत्या केली. वेलतूर पोलीस ठाण्या अंतर्गत आंभोरा येथे रविवारी ही घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या नजरेस या तिघांचे मृतदेह पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. श्याम गजानन नारनवरे (वय ४६), सवीता श्याम नारनवरे (वय ३५) कु. समिता उर्फ समीक्षा श्याम नारनवरे (वय १२) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

नारनवरे कुटुंब
नारनवरे कुटुंब

मासेमारांच्या लक्षात आली घटना -

श्याम नारनवरे हे संत जगनाडे महाराज कोऑपरेटीव्ह सोसायटीत रोखपाल असल्याची माहिती समोर आली आहे. वैनगंगा नदी पात्रात रविवारी सकाळी काही लोक मासेमारी करण्यासाठी गेले असता पुलावर त्यांना एक मोटरसायकल उभी दिसली. या मोटरसायकलला एक जॅकेट, एक लेडीज शाल व स्वेटर लटकलेले होते. तर गाडीच्या बाजूला कठड्यावर लेडीज चप्पल दिसली. शंका आल्याने मासेमारांनी पोलीस पाटलांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील वेलतूर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि पाण्यात शोधाशोध सुरू केली. पाण्यातून वडील, आई व मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही.

आत्महत्या की घातपात -

या हृदयद्रावक घटनेत आईचे हात मुलीच्या कंबरेला ओढणीने बांधलेले होते. तर वडीलांचेही हात बांधलेले होते. त्यामुळे नारनवरे कुटुंबाने आत्महत्या केली की या मागे घातपात आहे, या संदर्भात वेलतुर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Last Updated : Feb 1, 2021, 9:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.