हैदराबाद Hybrid Warfare Strategy - इस्रायलनं नुकताच लेबनॉनमध्ये घडवून आणलेला हल्ला सध्या चर्चेचा विषय आहे. इस्रायलच्या युनिट ८२०० या संरक्षण यंत्रणेने एका पेजरच्या सहाय्यानं सौरऊर्जा प्रणालीचे स्फोट घडवून आणले आणि हायब्रिड युद्धाची तीव्रता किती भयानक आहे हे जगाला दाखवून दिलं. या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये नुसतीच घबराट पसरली नाही तर, अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून शत्रू कसा घात करु शकतो हे दिसल्यानं अशा सर्व आधुनिक तांत्रिक उपकरणांची भीती वाटू लागली आणि पारंपरिक दळणवळणाच्या साधनांकडे वळण्यास बाध्य केलंय. यामुळे हिजबुल्लाच्या नेत्यांच्या मनात अनिश्चितता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून उद्भवणारे धोके देखील समोर आले आहेत.
इस्रायलमधील युनिट 8200, हे जेरुसलेम पोस्टनुसार, 'यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सी किंवा ब्रिटनच्या GCHQ प्रमाणेच आहे. इस्त्रायलच्या संरक्षण यंत्रणेतील सर्वात मोठे सायबर हल्ल्यांमध्ये निष्णात असलेली हे युनिट आहे. इराणी आण्विक सेंट्रीफ्यूजेस निष्प्रभ करण्यासाठी सायबर हल्ला करण्यासह अशाच इतर कामगिरी या युनिटनं बिनबोभाटपणे केल्या आहेत. हे युनिट हमास लक्ष्य निवडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यासाठी ओळखले जाते. मात्र गेल्यावर्षी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा अंदाज घेण्यात हे युनिट अपयशी ठरल्यामुळे त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. परिणामी त्याच्या प्रमुखाचा राजीनामा घेण्यात आला होता. विशेष म्हणजे याच यंत्रणेनं हा हल्ला घडवला आहे.
विविध माध्यमांच्यामधून आलेल्या माहितीवरुन असं लक्षात येतं की इस्रायलने हिजबुल्लाहनं ऑर्डर दिलेल्या उपकरणांमध्ये मधल्या मध्येच रेडिओ सिग्नलद्वारे स्फोट सक्षम करण्यासाठी स्फोटके आणि चिप्स बसवल्या. मात्र संबंधित कंपन्यांनी असं काही झालं असल्याचा इन्कार केलाय. तरीही इस्रायलच्याच बेनामी कंपन्यांमार्फत हे सगळं केलं असल्याचंही वृत्त आता समोर येत आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार अमेरिकेला या हल्ल्याची सूचना देण्यात आली होती. मात्र अमेरिकेनं आपण यामध्ये सहभागी असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तर इस्रायलने या वृत्तावर भाष्य करण्यास नकार दिला. तरीही, त्यांचे संरक्षण मंत्री, योव गॅलंट यांनी स्पष्ट केलं की, या युद्धानं एका नवीन प्रकारच्या युद्धाच्या युगाची सुरूवात करत आहोत.
या हल्ल्याच्या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की जगासाठी, हायब्रिड युद्ध धोकादायक टप्प्यावर आले आहे, ज्याचा संपूर्ण मानवजातीला धोका आहे. आत्तापर्यंतच्या दाव्यांनुसार संबंधित उपकरणांमध्ये स्फोटके पेरली गेली होती की इलेक्ट्रॉनिक सिग्नल वापरून अशाच प्रकारच्या बॅटरीचा स्फोट झाला होता हे स्पष्ट नाही. हॅकर्सनी पुष्टी केली आहे की, एखाद्या डिव्हाइसला दूरस्थपणे छेडछाड करण्यासाठी मालवेअर वापरणे शक्य आहे. इस्रायली मोबाइल सिग्नलवर आधारित वरिष्ठ कमांडरचा शोध घेतात आणि त्यांना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात येताच हिजबुल्ला पेजर्स वापरू लागले. मात्र या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी देखील धोकादायक आहेत हे स्पष्ट झालं. मात्र यामुळे हिजबुल्लाहच्या युद्ध डावपेचांवर परिणाम झाला आहे. कारण संवाद हा युद्धामध्ये अत्यंत आवश्यक आहे, तोच करणं धोकादायक झालय.
इस्रायलच्या या रणनीतीच्या कारवाईचा सुरुवातीला अनेक दहशतवादी संघटनांशी तसेच जागतिक स्तरावरच्या लढाईत धोरणात्मक प्रभाव पडेल. हिजबुल्लाहला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले जाईल पण अश्म-युगातील संवाद यंत्रणेसह ते सोपे नाही. यातून त्यांच्या नेतृत्वात काही काळ संभ्रम निर्माण होईल. इस्त्रायलीकडून याचाच नेमका फायदा घेतला जाईल.
हिजबुल्लाहची आता इस्रायली हेरांच्या संभाव्य अस्तित्वावर आणि हालचालीवर करडी नजर असेल. ज्यांनी MOSSAD ला या उपकरणांच्या ऑर्डरचे तपशील लीक केले असतील. यातून अंतर्गत अविश्वास वाढेल. इस्रायलशी संघर्षात गुंतलेले इतर दहशतवादी गट आता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन उपकरणांचा वापर करण्याबाबत सावधगिरी बाळगतील.
इस्रायलवर, हिजबुल्ला आणि त्याच्या सहयोगी देशांकडून रॉकेट हल्ल्यांसह मोठा बदला घेण्याची भीती आहे. इस्रायली लष्करी हल्ल्याची धमकी असूनही, बदला घेतल्याने जीवितहानी होऊ शकते. काही दिवसांपूर्वी शक्य झालेला युद्धविराम आता इतिहासजमा झाला आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या ओलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. इराणचे हस्तक आता इस्रायलला लक्ष्य करण्यासाठी एकत्र येतील.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संघर्ष वाढवण्याचं त्यांचं ध्येय साध्य केलं आहे. त्यामुळे त्यांची खुर्ची आणखी काही काळ सुरक्षित राहील. हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे माघार घेतलेल्या विस्थापित इस्रायलींना उत्तर इस्रायलमधील त्यांच्या घरी परत आणण्याच्या त्यांच्या वचनावर आधारित ऑपरेशन सुरू करण्यात आले. अमेरिकेलाही हे आता थांबवता येईल असं नाही. उलट अशी परिस्थिती निर्माण केली जाईल की, अमेरिकेला त्यांचे समर्थन करण्यास भाग पाडेल. शांतता आणि युद्धविरामाच्या आशा धुरात होत आहेत. हमासच्या हल्ल्याचा पहिला वर्धापन दिन जवळ आला आहे आणि इस्रायल आपले युद्ध उद्दिष्ट साध्य करण्याच्या जवळ नाही. त्यात कोणतीही रणनीती किंवा अंतिम टप्पा आल्याचं दिसत नाही. उलटपक्षी, त्यांनी अधिक दहशतवादी गटांना संघर्षात ओढलं आहे. संपूर्ण प्रदेशात जीवितहानी आणि विध्वंस मोठ्या प्रमाणात झाला आहे.
इराणनं जवळपास शंभर जखमी हिजबुल्लाह सैनिकांना वैद्यकीय उपचारांसाठी त्यांच्या देशात नेले. त्यांच्या सीमेवर असाच हल्ला होण्याची शक्यता त्यांना वाटणारच. पूर्वीच्या सायबर हल्ल्यात इस्त्रायलने त्याचे सेंट्रीफ्यूज निष्प्रभ केले होते. तीच पुनरावृत्ती होऊ शकते. लेबनॉनमधील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने इराणला सावध केले आहे.
जागतिक स्तरावर, अनेक देश त्यांच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी प्रणालींमध्ये एम्बेड केलेल्या स्थानिक पातळीवर विकसित सॉफ्टवेअरसह सुरक्षित नेटवर्क वापरत आहेत. यासाठी ते विश्वसनीय कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल संचांची ऑर्डर देतात. त्यात नंतर सुधारणा करण्यात येते. वरिष्ठ कमांडर्सच्या ठिकाणांशी कोणताही धोका न होता तसंच संवाद हॅक होण्यापासून रोखण्याच्या हेतूनं हे सगळं करण्यात येतं. इस्रायली कारवाईनंतर अशा सर्व उपकरणांची कोणत्याही मालवेअरसाठी पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुनही चालणार नाही.
मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असलेले, मुख्यत्वे चीन किंवा इतर विरोधी देशांकडून इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आयात करणाऱ्या राष्ट्रांमधील, त्यांच्या उपकरणांमधील अशा मालवेअरबद्दल चिंतित असेल. स्थानिक उत्पादन वाढवताना शत्रु राष्ट्रांकडून खरेदी कमी करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल. अनेक देश आता इस्रायली मॉडेलचा अभ्यास करतील आणि त्यांच्या शत्रूंना अधिक चांगल्या प्रकारे लक्ष्य करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करतील. यातून हायब्रीड वॉरफेअर आता नव्या टप्प्यात दाखल झाले आहे.
अनेक संवेदनशील ठिकाणी, संवेदनशील कर्मचारी नेमक्या ठिकाणाचा थांगपत्ता लागू नये यासाठी इंटरनेट नसलेल्या फोनवरुन संवाद साधतात. कायदेशीरदृष्ट्या, या हल्ल्याला बुबी ट्रॅप म्हटलं जाऊ शकतं, ज्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे. मात्र, इस्रायलनं या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचं नाकारलं आहे. मात्र मोबाईलसारख्या उपकरणांचा वापर थेट स्फोट घडवण्यात आणि स्फोटके प्लँट करण्यात करता येतो हे या हल्ल्यावरुन स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये आता आणखी
अत्याधुनिक संशोधनही केलं जाईल. अजूनही मोठे स्फोट केला जाऊ शकतात. यासंदर्भातील संशोधन आता मोठ्या प्रमाणावर केलं जाईल. आतापर्यंत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ड्रोनचा वापर झाला. आता इस्रायलने एक नवा मार्ग दाखवला आहे. यातून एकच गोष्ट निश्चित झाली आहे की, जग आता एका मोठ्या धोकादायक वळणारवर आलं आहे.
हेही वाचा...