ETV Bharat / entertainment

व्हॅनिटी व्हॅन न मिळाल्यानं 'या' सुपरस्टारने बसच्या फ्लोरवर झोपून काढले दिवस, आज आहे 7300 कोटींचा मालक - dil se shoot

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Dil Se Shoot : बॉलिवूडचा हा सुपरस्टार आज भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. दिग्दर्शक तिग्मांशू धुलियानं खुलासा केला आहे की, हा सुपरस्टार त्याच्या एका चित्रपटाच्या सेटवरील बसच्या फ्लोरवर झोपायचा. जाणून घ्या कोण आहे हा सुपरस्टार...

Dil Se Shoot
दिल से शूट (शाहरुख खान (Song Screen Grab))

मुंबई - Dil Se Shoot : बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. दरवर्षी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपटसृष्टीत दाखल होतात आणि त्यापैकी काहींनाच स्टारडम मिळते. चित्रपटांमध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कलाकारांना खूप संघर्ष करावा लागतो. एखाद्या अभिनेत्याला त्याच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला निर्माता-दिग्दर्शकांच्या हाताखाली एखाद्या नोकरसारखे काम करावे लागते. परंतु जेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात येतो, यानंतर तो स्वतःच्या इच्छेनुसार काम करू लागतो. आता दिग्दर्शक तिग्मांशू धुलियानंसुद्धा बॉलिवूडच्या एका सुपरस्टारबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

तिग्मांशू धुलियानं केला 'किंग खान'बद्दल खुलासा : तिग्मांशू धुलियानं एका मुलाखतीत सांगितलं की, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता चित्रपटाच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅन नसल्यामुळे बसच्या फ्लोरवर झोपून दिवस काढत होता. तिग्मांशू धुलियानं शाहरुख खानबरोबर 'दिल से' चित्रपटात काम केलंय. त्यांनी एका मुलाखतीत खुलासा करत म्हटलं की, "शाहरुख खानबरोबर मी 'दिल से' चित्रपटात काम केलं होतं. त्याची वागणूक अत्यंत नम्र आहे. शाहरुख 'दिल से' चित्रपटाची निर्मिती होण्यापूर्वी स्टार झाला होता. 'दिल से'चं शूटिंग लडाखमध्ये सुरू होतं आणि तेथे व्हॅनिटी व्हॅन नव्हती. त्यावेळी शाहरुख खान बसच्या फ्लोरवर झोपायचा आणि लंच ब्रेकमध्ये आराम करायचा, तो कोणालाही त्याच्या जवळ येण्यास मनाई करत नव्हता. आम्ही लडाखमध्ये शूटिंग करत होतो, मणि सरांना प्रवासादरम्यान कुठलंही ठिकाण आवडलं तर, तिथे आम्ही शूटिंग करत होतो. शाहरुख जेवणानंतर 30 मिनिटे आराम करत होता."

शाहरुख खानची एकूण संपत्ती : तिग्मांशू धुलियानं पुढं सांगितलं की, "क्रू मेंबर्स बसमध्ये ये-जा करत राहायचे, काहीजण शाहरुखच्या वरून ये-जा करीत असत, पण तो कधीच काही बोलला नाही, त्यानं कोणालाही बसमध्ये येण्यास नकार दिला नाही. चित्रपटामधील मुख्य अभिनेता असूनही त्याची कोणतीही तक्रार नव्हती, उलट शाहरुख सेटवर सगळ्यांच्या जेवणाबद्दल आवर्जून विचारायचा." तिग्मांशू धुलियानं 'झिरो' चित्रपटात शाहरुख खानच्या वडिलांची भूमिकाही साकारली आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये शाहरुख खानची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खाननं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नवजात कन्येला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - SHAH RUKH Meets DEEPIKAS BABY GIRL
  2. राणा दग्गुबतीनं केला शाहरुख खानच्या पायाला स्पर्श; आता व्हिडिओ होत आहे व्हायरल - Shah Rukh khan Rana Daggubati
  3. शाहरुख खाननं भरला सर्वाधिक कर, कपिल शर्मानं अल्लू अर्जुनला टाकले मागे - shah rukh khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.