नागपूर - शिवसेनेचे यशवंत जाधव ( Shivsena Leader Yashwant Jadhav ) यांच्या डायरीत काय नोंद आहे, हे माहीत नाही. मात्र, कोरोनाकाळात 24 महिन्यात 38 नवीन संपत्तीची खरेदी सेनेचे नेते यशवंत जाधव यांनी केली आहे. यावरून हेच सिद्ध होते की, 100 टक्के भष्ट्राचार झाला आहे. ( Corruption in BMC ) कोरोनाकाळात दुसरे काहीही नाही तर मुंबई महानगर पालिकेला लुटण्याचे काम सुरू होते, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मातोश्रीला 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख - मुंबईकरांची लूट होत आहे, असे आम्ही कोरोनाकाळात म्हणत होतो. मात्र, इनकम टॅक्स विभागाने केलेल्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आता सिद्ध झाले आहेत. इन्कम टॅक्स विभाग याची योग्य चौकशी करणार असल्याने यापेक्षा अधिक काही बोलण्याचे कारण नाही. मात्र, यात मुंबई करांची लूट झाली आहे, हे नक्की असे आरोप त्यांनी केला. तर राज्यात होत असलेल्या रोजच्या कारवायांमधून राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत एक डायरी मिळून आली आहे. यात मातोश्रीला 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख आहे. यावर हे पैसे यंशवंत जाधव यांनी आपल्या आईला दिल्याचे चौकशीत सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमैया यांनीही भष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले होते.
हेही वाचा - Suspicious Transactions : यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख? आयकरने जप्त केलेल्या डायरीतउल्लेख
कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा यशवंत जाधव यांच्यावर आरोप - भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉन्डरिंग ( Money Laundering ) आणि शंभर कोटींचा घोटाळा ( Hundred Crore Scam ) केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने आयकर विभागाने छापेमारी ( Income Tax Department Raid ) केली. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. तर यामिनी जाधव यांनी निवडणुकीत चुकीची माहिती दिल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यावर त्यांनी हे प्रकरण आयकर विभागाकडे दिले. त्यानुसार आयकर विभाग कारवाई करत असल्याचे महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे ( BJP Group Leader Prabhakar Shinde ) यांनी सांगितले होते.