ETV Bharat / state

दिलासादायक..! नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, टेस्टिंगची संख्याही घटली

author img

By

Published : Sep 28, 2020, 6:28 PM IST

आठ दिवसात केवळ १४ हजार आरटीपीसीआर चाचण्या झाल्या, तर २१ हजार ५५४ अँटिजेन टेस्ट नागपुरात झाल्या आहेत. त्यामध्ये ११ हजार २२७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकंदरीत नागपूर जिल्ह्यात काही प्रमाणात का होईना, रुग्ण संख्या कमी झाल्याने सामान्य नागरिकांप्रमाणेच प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक घट

नागपूर- कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरात अचानकपणे रुग्ण संख्या कमी झाल्याची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात २४ हजार रुग्णांची वाढ झाली असताना या महिन्यातसुद्धा कोरोनाचा धुमाकूळ सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये अचानकपणे रुग्णसंख्या रोडवली आहे. अचानक रुग्ण संख्या कमी होण्याच्या कारणांचा शोध घेतला तेव्हा, जिथे टेस्टिंग वाढवण्याची गरज होती, तेथे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

११ मार्चला नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण पुढे आला होता. ११ मार्च ते २८ सप्टेंबर या साडेसहा महिन्यांच्या कालावधीत नागपुरातील एकूण रुग्ण संख्या ही ७५ हजार इतकी झाली आहे. तर, ६० हजार रुग्णांनी कोरोनावर मात सुद्धा केली आहे. ज्यावेळी नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली होती, त्यावेळी साधारणपणे सहा ते आठ हजार चाचण्या व्हायच्या. त्यावेळी, १ हजार ५०० ते २ हजार रुग्ण पॉझिटिव्ह देखील यायचे. मात्र, आता टेस्टिंगची संख्या ३ ते ४ हजारापर्यंत आली असताना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

१ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान नागपुरात ३३ हजार रुग्ण पुढे आले होते. तर पुढील आठ दिवसांमध्ये १० हजार रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. टेस्टिंग बाबत देखील हीच बाब समोर आली आहे. २० दिवसांमध्ये ६१ हजार ४०० आरटीपीसीआर टेस्ट झाल्या होत्या. तर, याच काळात ४१ हजार ५७५ अँटिजेन टेस्ट झाल्या होत्या. मात्र, २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान टेस्टिंगसह रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची टक्केवारीसुद्धा कमी झाली आहे. आठ दिवसात केवळ १४ हजार आरटीपीसीआर चाचण्या झाल्या, तर २१ हजार ५५४ अँटिजेन टेस्ट नागपुरात झाल्या आहेत. त्यामध्ये ११ हजार २२७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकंदरीत काही प्रमाणात का होई ना, रुग्ण संख्या कमी झाल्याने सामान्य नागरिकांप्रमाणेच प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा- अत्याधुनिक आरोग्य सेवेसाठी ५०० कोटींचे विशेष अनुदान द्या, स्थायी समिती सभापतींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.