ETV Bharat / state

पूर्व विदर्भात कोरोनाचा विस्फोट कायम; शुक्रवारी 1897 रुग्णांची नोंद - chandrapur corona news

गेल्या 24 तासांत पूर्व विदर्भात सर्वाधिक 1897 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच नागपूरमध्ये शुक्रवारी 1393 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

corona patients are rising in east vidarbha
पूर्व विदर्भात कोरोनाचा विस्फोट कायम; शुक्रवारी 1897 रुग्णांची नोंद
author img

By

Published : Mar 6, 2021, 7:50 AM IST

नागपूर - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा विस्पोट होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत पूर्व विदर्भात सर्वाधिक 1897 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच नागपूरमध्ये शुक्रवारी 1393 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

रिपोर्ट

शुक्रवारी महिन्याभरातील सर्वाधिक रुग्ण -

पूर्व विदर्भात मागील महिन्याभरातील सर्वाधिक रुग्ण शुक्रवारी नोंदवल्या गेले. नागपूरात 1393 रुग्णासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 5 रुग्ण शहरातील असून 2 रुग्ण ग्रामीण भागातील, तर 2 बाहेरजिल्ह्यातून उपचाराकरिता आले होते. तसेच गडचिरोलीत 4 तर वर्ध्यात 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 4374 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 10432 वर पोहोचली आहे.

अशी आहे शुक्रवारची आकडेवारी -

पूर्व विदर्भात शुक्रवारी 1897 रुग्णांची भर पडली असून 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर नागपूर जिल्ह्यात 1393 रुगांची भर असून 583 रुग्ण कोरोनातून बरे झाले. वर्ध्यातही शुक्रवारी 267 रुग्णांची भर पडली असून 111 जंणाची कोरोनातून सुटका झाली. चंद्रपूर जिल्ह्यात 176 रुग्ण असून 54 रुग्ण कोरोनातून बरे झाले. भंडाऱ्यामध्ये 32 रुग्णांची भर पडली असून 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गोंदियात 14 नवे कोरोनाबाधित मिळाले असून 16 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 15 बधितांची नोंद असून 5 जण कोरोनामुक्त झाले आहे.

रिकव्हरी रेटमध्ये घसरण -

रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीतून पुढे येत आहे. यात नागपूर जिल्ह्यात गुरुवारी 726 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. मागील पाच दिवसांत 2583 जणांना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. मागील 10 दिवसात रुग्णांचा रिकव्हरी रेट पाहता 92.5 टक्केवरून घसरण होत 90.46 वर आलेला आहे. यामुळेही चिंतेत वाढ झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये वाढ -

प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना आणि वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख पाहता लॉकडाऊला मुद्दत वाढ देण्यात आली आहे. 7 मार्चपर्यंत असलेली विविध सेवा आणि शाळा महाविद्यालये बंदी तसेच लग्नसोहळा, धार्मिक व समाजिक कार्यक्रमांवारील निर्बध 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे.

हेही वाचा- दक्षिण आफ्रिकेतून औषध आणून देण्याच्या नावाखाली रुग्णाला दिली पिठी साखर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.