नागपूर- देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागपुरात मात्र गेल्या 4 दिवसांपासून आतापर्यंत एकही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यामुळे नागपुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सध्या 16 वरच स्थिरावली आहे. सध्या हे आकडे सुखावणारे असले तरी मरकझ वरून परत आलेल्यांचा अहवाल येणे बाकी असल्याने धाकधूक मात्र कायम आहे.
हेही वाचा-कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत
16 पैकी 4 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून एकाही नव्या कोरोना रुग्णाची नागपुरात नोंद करण्यात आलेली नाही. 'मरकझ'हून आलेल्या विलगिकरणातील व्यक्तींचे नमुने आजपासून तपासयाला सुरूवात होणार आहे.
दिल्लीच्या मरकझहून परत आलेल्या 60 व्यक्तींची ओळख पटवण्यात आलीआहे. मेडिकलमध्ये दाखल असणाऱ्या १ रुग्णाच्या व्यतिरिक्त मरकझहून परतलेल्याचे नमुने तपासून झाले नाही, ते अद्यापही पडून आहेत.
मेयो रुग्णालयाच्या प्रयोगशाळेवर तपासणीचा ताण वढल्याने प्राधान्य पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना असल्याने ही स्थिती आहे. सध्या मेयोत 24 तासात पूर्ण क्षमतेने 100 च्या जवळपास नमुनेच तपासण्याची क्षमता आहे.