नागपूर: नागपूरसारख्या महानगरात रोज गुन्हे घडतात, अनेक गुन्हेगार पकडले देखील जातात. त्यापैकी काहीं आरोपींना शिक्षा होते. मात्र बहुतांश आरोपी हे पुराव्या अभावी मोकळे सुटतात. वर्षभर एकूण दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी किती आरोपींना शिक्षा झाली याचा आढावा घेतला तर पूर्वी हा आकडा 10 ते 25 टक्यांच्या घरात असायचा. (Conviction Rate In Nagpur). मात्र यावर्षीच्या 10 महिन्यात दोष सिद्धीची टक्केवारी तब्बल 58 टक्के झाली असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. (conviction rate in nagpur increased).
दोष सिद्धीचे प्रमाण 12 टक्यांची वाढले: पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे आरोपीच्या दोष सिद्धतेवरून ठरत असते. त्यामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा असे निर्देश पोलीस आयुक्तांनी यांनी दिले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 2004 साली नागपूरात दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 10 टक्के होतं. 2014 साली हा आकडा 15 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. परंतु यावर्षीच्या 9 महिन्यात नागपूरात दोष सिद्धीचे प्रमाण 58 टक्यांवर गेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्यांची वाढले आहे हे विशेष.
2004 साली दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 10 टक्के: नागपूर पोलिसांनी गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्यांच्या वरील दोष सिद्ध कसे होतील यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे यावर्षीच्या 10 महिन्यात दोष सिद्धीची टक्केवारी 58 टक्के इतकी झाली. मात्र 2004 साली हे प्रमाण केवळ 10 टक्के इतके होते. 2005 यावर्षी दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 8 टक्के होते तर पुढच्या वर्षी म्हणजे 2006 साली 9 टक्के इतकेचं होते. 2007 आणि 2008 साली तर दोष सिद्धीचे प्रमाण केवळ 6 टक्के इतके होते. 2009 साली 3 टक्यांची हे प्रमाण वाढल्यानंतर 2010 केवळ 5 टक्के आणि 2011 साली तर केवळ 4 टक्के गुन्हेगारांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. 2012 पासून या परिस्थितीत सुधारणा दिसू लागली होती. 2012 साली गुन्हे सिद्धीचे प्रमाण 13 टक्यांवर गेल्यानंतर 2013 यावर्षी हे प्रमाण 21 टक्यांपर्यत गेले होते. 2014 या वर्षात मात्र तब्बल 6 टक्यांची घट नोंदवण्यात आली होती. 2014 साली दोष सिद्धीचे प्रमाण 15 टक्के होत. 2015 यावर्षी 16 टक्के तर 2016 मध्ये 31 टक्यांपर्यत कव्हीकशन रेट गेला होता. मात्र त्यानंतर पुढील म्हणजेच 2017 आणि 2018 साली गुन्हेगाराला शिक्षा मिळण्याचे प्रमाण 9 टक्यांवर आले. 2019 या वर्षी 26 टक्के,2020 साली 37 टक्के तर 2021 यावर्षात 46 टक्के दोष सिद्धीची प्रमाण नोंदवण्यात आले असून यावर्षीच्या दहा महिन्यात हे प्रमाण 58 टक्यांपर्यंत पोहचले आहे.