नागपूर - जनतेच्या संपर्कात राहून कामे करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी मिळणार नसेल आणि दिल्लीची वारी करणाऱ्या चमकोंना उमेदवारी मिळत असेल, तर उमेदवारी अर्ज दाखल करू देणार नाही, असे काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा - विरोधकांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची पिचड यांना शह देण्याची तैयारी
जनतेच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल पक्षाला माहिती नाही. निवडणूक काळात चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांची आता दिल्ली मुंबई वारी सुरू आहे. अशा नेत्यांना पक्ष श्रेष्ठींनी उमेदवारी देऊ नये. असे परखड मत विकास ठाकरेंनी व्यक्त केले आहे. देवडिया भवनात झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हे ही वाचा -साताऱ्यात राष्ट्रवादी सोडणारा कधी खासदार होत नाही - जयंत पाटील