नागपूर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात केलेल्या आरोपानंतर राज्यात माहाविकास आघाडीत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. यावर मात्र नाना पटोलेंनी सोमवारी (दि. 12 जुलै) बाजू सावरत भाजप प्रसार माध्यमांधून चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय काँग्रेसच्या मेळाव्यातील वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलताना म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या काँग्रेस पक्षाचा मेळाव्यात पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यावेळी बोलताना काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याचा भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे आयबीच्या माध्यमातून पाळत ठेवत असल्याचे ते म्हणाले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
आमच्यात वाद नाही हे सरकार 5 वर्षे टिकेल
यावेळी नाना पटोले म्हणाले, मी पक्षाची भूमिका मांडत महाराष्ट्रात फिरत आहे. काँग्रेस-भाजप विरोधात आहे. यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने चुकीच्या बातम्या पेरल्या जात असल्याचे नाना म्हणाले. माहाविकास आघाडीमध्ये एकमातने काम सुरू आहे. आयबीची दैनंदिन पद्धत आहे. घडामोडींची माहिती राज्यालाच नाही तर केंद्राही जात असते. हे नियमित प्रक्रिया असल्याने याला वादग्रस्त म्हणायला काही कारण नाही, असे म्हणत लोणावळ्यातील वक्तव्यावर पटोले यांनी सारवासारव केली. यावेळी अजित पवारांच्या नाराजीवर पटोले म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून चर्चा करू कोणी वाद निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असले तर चर्चेने प्रश्न सुटतात, असे काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आमच्यात वाद नाही. पाच वर्षे सत्ता टिकेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
भाजप अपयशी ठरल्याने चुकीच्या बातम्या पसरवत आहे
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार पडेल, अशी भाषा भाजप करत आहे. पावणे दोन वर्षे झाले भाजपचे अपयशी ठरल्याने चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवण्याचे काम भाजप करत असल्याचे म्हणत भाजपवर याचे खापर फोडले आहे. मुळात काँग्रेस ही राष्ट्रवादी आणि शिवसेना हे विरोधी नाही तर भाजप विरोधी आहे. काँग्रेसने 60 वर्षात हा पक्ष देशात उभा केला. भाजप आज तो देश विकला जात असल्याने काँग्रेस सहन करणार नाही. ही जनतेची लढाई आहे. काँग्रेस महागाईच्या विरोधात रस्त्यावर येऊन जनतेसाठी लढत आहे. यामुळे या तीन पक्षात भांडण असल्याचे सांगत आहे.
भाजप देश विकायला निघाली आहे
मी कसा दिसतो, असे वक्तव्य करणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिला शोभणारे नाही, असे म्हणत नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील नाराजी व्यक्त केली. लोकांचे जीव जात असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लसीची मागणी करत आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. आजची परिस्थिती पाहता भाजप लोकांचे रक्त काढून त्यांना आर्थिक अपंगत्व आणण्याचे काम करत आहे. भाजप सध्या देश विकायला निघाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यानी केंद्रात जाऊन केंद्रातील भाजपला विरोधा करावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
लोकांचे मत काँग्रेसच्या बाजूने असल्याने भाजप काँग्रेला टार्गेट करतेय
काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी दिवस असो वा रात्र काम करत आहे. त्यामुळे लोकांचे मत काँग्रेसच्या बाजून भक्कम असल्याने काँग्रेसला भाजप टार्गेट करत असल्याचेही पटोले म्हणाले.
हेही वाचा - नानांनी आधी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी - नवाब मलिक