ETV Bharat / state

मान्सून पूर्वतयारीची अहवाल सात दिवसात पूर्ण करा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

जिल्हाधिकाऱ्यांनी या वर्षीचे सर्व विभागाचे नियोजन पुढील सात दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले. हवामान खात्याने यावर्षी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १५ जून पर्यंत नागपूरला मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात सर्व नियोजन पूर्ण करायचे आहे.

Breaking News
author img

By

Published : May 24, 2021, 9:56 AM IST

नागपूर - गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सर्वात मोठा पूर अनुभवलेल्या नागपूर जिल्ह्याने येत्या मान्सूनसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मान्सून पूर्व बैठकीत कोरोना संसर्ग आणि गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुराचा धोका असणाऱ्या 341 गावांना कोणताही हानी पोहोचणार नाही, अशा पद्धतीचे सुसज्ज नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुखांची मान्सूनपूर्व बैठक मान्सून पूर्वतयारीची अहवाल सात दिवसात पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तीनशे पंधरा वर्षात पाहिला नसेल इतका भयानक पूर नागपूर जिल्ह्यात
गेल्यावर्षी 28 व 29 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातील चौराई धरणाच्या ग्रहण क्षेत्रात काही तासांमध्ये 414 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे चौराई धरणातून 98 टक्के भरलेल्या तोतलाडोह धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. तोतलाडोहचा विसर्ग वाढविणे आवश्यक असल्याने गेल्या तीनशे पंधरा वर्षात आला नसेल इतका भयानक पूर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, मौदा, सावनेर तालुक्याने बघितला. सुदैवाने प्रशासनाच्या जागरूकतेने कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र प्रचंड वित्त हानी झाली.

प्रकल्पांचे ऑडिट करा, अहवाल तयार करा
जिल्हाधिकाऱ्यांनी या वर्षीचे सर्व विभागाचे नियोजन पुढील सात दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले. हवामान खात्याने यावर्षी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १५ जून पर्यंत नागपूरला मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात सर्व नियोजन पूर्ण करायचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पाच मोठ्या आणि १२ मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करावे यासोबतच लघु प्रकल्प, तसेच तलाव बंधारे याबाबतही काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे.

मध्यप्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापणा सोबत होणार बैठक

मध्यप्रदेशातील आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात येत्या आठवडयात बैठक होणार आहे. यावेळी मध्य प्रदेशातून येणाऱ्या नद्यांवरील धरणातील पाण्याचा विसर्गावर चर्चा करण्यात येणार असून नागपूर भंडारा जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहे. गेल्यावेळी 28 हजार पूरग्रस्तांना हलविण्यात आले होते. त्यामुळे संपर्क व्यवस्था अतिशय मजबूत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीतील निर्णय

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय
बोटी, लाईफ जॅकेट, प्रशिक्षित मणुष्यबळ यंत्रसामुग्री तपासून तयार ठेवणे, कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रणाच्या दृष्टीने आरोग्य विभागाने दुर्गम गावांपासून सर्वत्र उपायोजना करणे, वीज पडून मृत्युमुखी पडणार नाही, यासाठी जनजागृती मोहीम राबवणे, सर्व मोठ्या मध्यम, लघू, प्रकल्प व जिल्ह्यातील तलावांचे परिक्षण करणे, जिल्ह्यातील संपूर्ण 341 गावांमध्ये संपर्क यंत्रणा आणि सतर्कता ठेवण्याची यंत्रणा बळकट करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. सोबतच बांधकाम विभाग आणि वीज वितरण विभागातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जागृत करून त्यादृष्टीने महत्वाचे कामे करण्याचा सूचना दिल्यात. यासोबत सामाजिक संस्थांशी बोलून अडचणी जाणून घेऊन त्यावर काम करण्याचेही निर्देश दिलेत.या बैठकीला जिल्हाधिकारी कक्षातून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,राज्य आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड, पोलिस, स्वयंसेवी संस्था, रेड क्रॉस इ. उपस्थित होते. हेही वाचा-राजभवनात कोणत्या भुताटकीचा वावर वाढला? शिवसेनेचा सवाल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.