ETV Bharat / state

MP Balu Dhanorkar फडणवीसांवर जातीवाचक टिपण्णी करणाऱ्या खासदाराच्या विरोधात तक्रार - Deputy CM Devendra Fadnavis

खासदार बाळू धानोरकर MP Balu Dhanorkar यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात आता नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राम्हण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

complaint register against Balu Dhanorkar
बाळू धानोरकर यांच्याविरोधात तक्रार
author img

By

Published : Aug 17, 2022, 5:31 PM IST

नागपूर काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर MP Balu Dhanorkar यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis आणि ब्राम्हण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे Complaint application against MP Balu Dhanorkar . पोलिसांनी खासदार धानोरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

जाती-जातीमध्ये तेढ निर्माण 13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी एका सभेत बोलताना खासदार बाळू धानोरकर यांनी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते Balu Dhanorkar statement against Brahmin community . त्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. खासदार बाळू धानोरकर यांच्या निषेधार्थ पोस्टरबाजी करण्यात आली.

काय म्हणाले होते धानोरकर काँग्रेस पक्षाच्या आघाडी गौरव यात्रा दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहे ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळतात. त्यांचे हे वादग्रस्त वक्तव्य जातीय तेढ निर्माण करणारे आहेत असा आरोप भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा Aurangabad Crime औरंगाबादमध्ये प्रियकरकाडून प्रियसीची गळा चिरून हत्या

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.