नागपूर - लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. १२ आणि १९ मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १५ ते २० तास लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या एका राऊंडमध्ये १२० पोलिंग सेंटरचे काऊंटिंग करण्यात येणार आहे. एकूण २० राऊंड टेबलची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. निवडणूक अयोगाच्या आदेशानुसार पाहिल्या राऊंडची मतमोजणी झाल्यानंतरच दुसऱ्या राऊंडला सुरूवात होईल. एका राऊंडच्या घोषणेसाठी ४०-४५ मिनिटांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी १५ तांसावर कालावधी लागणार आहे.
याआधी एक राऊंड सुरू असताना घोषणेआधी दुसरा राऊंड घेतला जात होता. त्यामुळे मतमोजणीचा वेळ वाचत असे. मात्र, आयोगाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षीपासून निवडणुकीच्या मतमोजणीसाठी उशीर होणाची शक्यता आहे, अशी माहिती अश्विन मुद्गल यांनी दिली.