ETV Bharat / state

Appeal of MSEDCL : बनावट ‘एसएमएस’वर नागरिकांनी विश्वास ठेवू नये- महावितरणचे आवाहन - should not believe in fake SMS

त्वरित वीज बिल भरा (Pay the electricity bill immediately) अन्यथा वीज पुरवठा खंडित होईल. अश्या पद्धतीने महावितरण कंपनीच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा काहीनी शोधून काढला. त्यामुळे अश्या मॅसेजवर विश्वास न ठेवता कुठलिही लिंक उघडून माहिती देऊ नये (should not believe in fake SMS) असे आवाहन महा वितरण कंपनीने (MSEDCL appeals) केले आहे.

MSEDCL
महावितरण
author img

By

Published : May 11, 2022, 7:16 PM IST

नागपूर: महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ महावितरण (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. महावितरण केवळ देखभाल किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी हा संदेश पाठवला जाते. त्यामुळे ग्राहकांनी बनावट ‘एसएमएस’वर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

उमरेड येथील जीवन विकास शाळेचे पदाधिकारी प्रशांत सपाटे यांना ४ मे रोजी मोबाईलवर मेसेज आला त्यात वीज बिल न भरल्यामुळे तुमचा वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी १०.३० नंतर खंडित करण्यात येइल असे सांगण्यात आले. पण वेळीच लक्षात आल्याने माहिती न देता सतर्क राहिल्याने आर्थिक नुकसान टळले. या प्रकरणी महावितरणच्या उमरेड विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी उमरेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी विश्वास ठेवू नये. महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातूनच वीज बिल भरावे. मोबाईलवर आल्या संदेशवर वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : Sports Equipment Scam : नागपूर महापालिकेतील क्रीडा साहित्य वाटप घोटाळ्यातील सर्व नगरसेवक आरोपमुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.