ETV Bharat / state

उघड्या डीपीच्या तारेचा स्पर्श झाल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू; नागपुरच्या उमरेड तालुक्यातील घटना - child dies due to electric wire

गुरुवारी नैतिकची प्रकृती चांगली नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात न्यायचे होते. नैतिकचे वडील हे मासेमारीचा व्यवसाय करत असल्याने ते घरी नव्हते. यामुळे नैतिकची आजी पुष्पा यांनी त्याला गावातील दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

naitik bawne
मृत नैतिक बावणे
author img

By

Published : Jun 25, 2021, 9:45 AM IST

नागपूर - उघड्या विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श झाल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना काल (गुरुवारी) 4 वाजताच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्सी येथे घडली. नैतिक पुजाराम बावणे (३ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

काय आहे घटना ?

गुरुवारी नैतिकची प्रकृती चांगली नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात न्यायचे होते. नैतिकचे वडील हे मासेमारीचा व्यवसाय करत असल्याने ते घरी नव्हते. यामुळे नैतिकची आजी पुष्पा यांनी त्याला गावातील दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दवाखान्यात घेऊन जात असताना यावेळी नैतिकला शौचास जायचे असल्याने त्याला रस्त्याच्या कडेला बसवले. तेथे एक गाय नैतिकच्या दिशेने येत असल्याने आजी हकलण्यासाठी गेली. याचदरम्यान नैतिकच्या पाठीमागे असलेल्या उघड्या डीपीच्या तारेचा त्याला स्पर्श झाला. तेथेच त्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. त्याच्या आजी पुष्पा यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर लागलीच नैतिकला सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी नैतिकला मृत घोषित केले.

हेही वाचा - नागपूरमध्ये कन्हान नदीत बुडालेल्या तीनही तरुणांचे मृतदेह सापडले

सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. यात उघड्या असणाऱ्या डीपी धोकादायक ठरू शकतात. यात गाव खेड्यात अनेकदा वेलीची विळखा असल्याने लक्षात येत नाही. यामुळे डीपीच्या ताराचा स्पर्श झाल्याने चिमुकल्याचा जीव गेला. यामुळे संतप्त होत कुटुंबीय तसेच गावातील नागरिक अखिल रोडे यांनी केली.

हेही वाचा - उपराजधानीत 616 कोरोना संक्रमित, आठवड्यात दोन दिवस मृत्यू संख्या शून्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.