नागपुर - चांद्रयान -२ या महत्वकांक्षी अंतराळ यानाचे प्रक्षेपण आज झाले आहे. अमेरिका रशिया चीन नंतर भारत जगात प्रतिनिधित्व करू शकेल. संपूर्ण स्वदेशी असा हा मिशन असून काही भाग वगळता यात अनेक भारतीय उपकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे भारत हा पहिला देश आहे. जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाईल. पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू आपण पाहू शकतो. मात्र जी दुसरी बाजू पृथ्वीवरून बघू शकत नाही. अश्या या दक्षिण ध्रुवावर भारताने अंतराळ यान पाठवले आहे. या मोहिमेतुन चंद्रारील मातींची कण द्रव रूप कोणत्या तत्त्वांनी बनल्या आहेत. तसेच तेथील भूसंरचना नेहमी कशी आहे या बद्दलचा अभ्यास या मोहिमेतून केला जाईल, अशी माहिती रमण विज्ञान केंद आणि तारा मंडळाच्या वैज्ञानिकांनी सांगितली आहे.