नागपूर - सरकारी मदतीवरती आमचा बहिष्कार आहे. कोणत्याही कामात मी सरकारची मदत घेत नाही. आम्हाला मदत नको पण, चालत्या कामात सरकारने खिळे टाकून ते काम पंक्चर करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला लगावला आहे.
नागपूरमध्ये विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या सामंजस्य करार कार्यक्रमावेळी गडकरी बोलत होते. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर देखील उपस्थित होते.
हेही वाचा - नागपूर : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शनिवारी शाळांना सुट्टी, पंतप्रधानांचा दौराही रद्द
माझे प्रयोग 'आउट ऑफ द बॉक्स' असतात. त्यामुळे कोणी सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. पण ते सगळे प्रयोग मी स्वतः यशस्वी करुन दाखवतो. त्यासाठी सरकारी मदत आणि सबसिडी मी घेत नाही. मला सबसिडी नको मात्र, चालत्या कामात सरकारने आडकाठी घालू नये, असे गडकरी म्हणाले. सरकारी मदती संदर्भात गडकरी यांनी यापूर्वी देखील वक्तव्य केलेली आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत उद्योग व्यवसायाला यशस्वी केले जाऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.