ETV Bharat / state

NVCC : एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाड़िया यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल

author img

By

Published : Feb 23, 2023, 5:46 PM IST

NVCC नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अश्विन मेहाडियाविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक, विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NVCC
NVCC
अश्विन मेहाड़िया यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल

नागपूर : एनव्हीसीसी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष अश्विन मेहाड़िया यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर चौकशी अंती सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक गुन्हेगारी, फसवणूक, बनावटी कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात अशा विविध कलमांखाली अश्विन मेहाडिया यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सर्वसाधारण सभेतही गदारोळ : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ही मध्य भारतातील एक महत्त्वाची व्यापारी संघटना मानली जाते. गेल्या काही महिन्यांपासून एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या कार्यपद्धतीवर काही माजी अध्यक्षांनी आक्षेप घेतला आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला.

आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. डिसेंबरमध्ये चेंबरच्या सर्वसाधारण सभेत माजी सदस्यांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर जानेवारीमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने NVCC वर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेंबरचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून माजी अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्याविरुद्ध नागपुरातील सीताबर्डी पोलिसात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष : साधारणतः दोन महिन्यांपूर्वी नाग विदर्भ चेम्बर ऑफ काॅमर्सची आमसभा आणि निवडणूक घेण्यात आली. त्यात अध्यक्ष अश्विन मेहाडीया यांच्यासह विद्यमान कार्यकारणी दुसऱ्यांदा निवडून आली. ही निवड अनेक सदस्यांना मान्य नसल्याने आजी-माजी सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. अक्षरशः हाणामारी पर्यत प्रकरण गेलं होता. संतप्त झालेल्या माजी पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गदारोळ केला. अश्विन प्रकाश मेहाडीया यांच्या मनमानी कारभारा विरोधात माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकरा माजी अध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

प्रशासकांची नियुक्ती : गेल्या महिन्यात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल कडून एनवीसीसीवर प्रशासकाची नियुक्ति करण्याचा निर्णय दिला होता. व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या एनवीसीसी संघटनेवर पहिल्यांदाच प्रशासक नेमणूक करण्याची वेळ ओढवली आहे.

हेही वाचा - CAG on Government Schemes : शासनाच्या विविध योजनांमध्ये निधीची अफरातफर; कॅगचा ठपका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.