ETV Bharat / state

पोटनिवडणूक : नागपुरात चौरंगी लढत.. जि.प. साठी ७९ तर, पं.स. निवडणुकीत १२५ उमेदवार रिंगणात

author img

By

Published : Sep 28, 2021, 4:36 PM IST

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार धुळे, नंदुरबार,अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्यातंर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे

By-election in nagpur
By-election in nagpur

नागपूर - राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार धुळे, नंदुरबार,अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्यातंर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागेकरिता ७९ उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समितीच्या ३१ जागांकरिता १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत ६ लाख १६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २ लाख ९६ हजार ७२१ स्त्री मतदार आणि ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार आहेत. उमेदवारांकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरूवात झाली आहे.

हे ही वाचा -मुलींची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही चुकीचं केलं नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार - अनिल परब

नागपुरात चौरंगी लढत -

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी झालेली आहे. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिवसेना देखील स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.