ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : राहुल गांधींनी सावरकरांची माफी मागावी अन्यथा...; बावनकुळेंनी दिला इशारा

राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळा अपमान केला आहे. अजूनही त्यांची भूमिका बदललेली नाही, ती त्यांनी स्पष्ट केलेले नाही. ते आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटण्याच्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल केलेल्या सर्व वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Bawankule On Rahul Gandhi
राहूल गांधीना महाराष्ट्रात फिरू देणार नाही
author img

By

Published : Apr 14, 2023, 5:18 PM IST

राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही

नागपूर : राहुल गांधीनी सावरकरांची अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करीत राहतात. त्यांनी सावरकारांची माफी मागावी अन्याथा त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते आज नागपूरात पत्रकारांशी संवाद साधत होते.

देशातील प्रत्येक भारतीय नागरिक हिंदुस्थानी : हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक भारतीय नागरिक हिंदुस्थानी आहे. भारतीय विचाराचा आहे. या देशात राहणारा प्रत्येक माणूस हिंदुत्ववादीच आहे. हिंदुत्वाचा विचार सर्वांनाच मान्य राहिला पाहिजे. कारण भारत हिंदुत्ववादी देश आहे. ते सर्व हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. त्याला दुसरी काही नवीन व्याख्या नको. आपण हिंदुस्थानात राहतो. आपण पाकिस्तानात राहत नाही. भारतात राहणारे प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे, भारत हेच हिंदुस्तान असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांना प्रवक्ते उत्तर देतील : संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी सात प्रवक्ते नेमले आहेत ते त्यांना उत्तर देतील असा टोला देखील त्यांनी लावला आहे.
महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा दुसरी सभा १६ एप्रिलला नागपूरात होणार आहे. पहिल्या सभेमध्ये केवळ आक्रोश होता, शिल्लक सेनेची बोंबाबोंब सभा होती असं देखील बावनकुळे काही दिवसांपूर्वी म्हणले होते. मात्र, १६ एप्रिलच्या सभेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी? : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनीही सावरकरांवर टीका केली होती. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागीतली होती असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. वाशिम जिल्ह्यातील एका सभेत त्यांनी सावरकरांवर कडाडून टीका केली. एकीकडे इंग्रजांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्व होते, तर दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर होते, अशा शब्दांत राहुल गांधींनी सावरकरांवर टीकास्त्र सोडले होते. तसेच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी विरोधात देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना आपली खासदारकी गमावावी लागली आहे.

हेही वाचा - CM Shinde On Dr. Ambedkar Memorial Fund : बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.