ETV Bharat / state

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून भाजप आक्रमक, महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने - नागपूर भाजप आंदोलन

एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून नागपुरात काँग्रेस पक्ष भाजपला घेरण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरी भाजपने वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले. लोकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी वाढीव वीज बिल भरू नये. कुणी दमदाटी केल्यास त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते सक्षम असल्याचे प्रवीण दटके म्हणाले.

bjp agitation nagpur  nagpur latest news  bjp agitation against electric bill  nagpur bjp news  नागपूर लेटेस्ट न्यूज  नागपूर भाजप आंदोलन  वीज बिलाविरोधात भाजप आंदोलन
वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून भाजप आक्रमक, महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने
author img

By

Published : Jun 29, 2020, 7:58 PM IST

नागपूर - शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात महावितरणच्या कार्यालयासमोर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भरमसाठ वीज बिल दिल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. महालमधील तुळशीबाग येथील महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर भाजप आमदार आणि पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊन दरम्यान दरमहा १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करू, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, ग्राहकांना भरमसाठ वीजबिल आले आहे. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ऊर्जा विभागाने त्याची अंमलबजावणी करावी, विजबिलांमध्ये रेग्युलेटरी बोर्डाने केलेल्या ७ टक्क्यांच्या वाढीला वर्षभर स्थगिती देण्यात द्यावी, बिलातील रकमेवर चुकीचे लागून आलेले व्याज माफ करावे, तीन महिन्याचे आलेल्या बिलांचे तीन इंस्टॉलमेंट केले पाहिजे, अशी मागणी भाजपने या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून भाजप आक्रमक, महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने

लोकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी वाढीव वीज बिल भरू नये. कुणी दमदाटी केल्यास त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते सक्षम असल्याचे प्रवीण दटके म्हणाले. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.