नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य दिनी पडलेल्या अमृतमहोत्सवाचा विसर कायम स्मरणात राहण्यासाठी भाजप 'स्मरण पत्र' पाठवणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर याच करवाईचा निषेध करण्यासाठी हा उपक्रम भाजप युवा मोर्च्याकडून हाती घेणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपूरात बोलत होते.
भाजप 75 हजार स्मरण पत्रं वर्षा बंगल्यावर पाठवणार
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांना ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाषणात मुख्यमंत्र्यांना अमृतमहोत्सवाचा विसर पडला, असे म्हटले होते. यावेळी राणेंनी वादग्रस्त वक्तव्ये केले. त्यामुळे राज्यभर वातावरण तापले. यानंतर राणेंवर अटकेची कारवाई झाली. त्यामुळे आता भाजपाजडून या सर्व कारवाईचा निषेध करण्यात आला. भाजपच्या कार्यलयाची तोडफोड झाली. यामुळे मुख्यमंत्री यांना देशाचा अमृतमहोत्सवाचा विसर पडतो आणि तो आता कायम स्मरणात राहावा, यासाठी किमान 75 हजार पत्र हे वर्षा बंगल्यावर पाठवणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
भाजपचे युवा वॉरीयर्स पाठवणार पत्रं
'किमान महिनाभर रोज वाचता येतील इतकी पत्रं पाठवली जाणार आहेत. भाजपच्या युवा आघाडीतील 18 ते 25 वयोगटातील युवा वॉरीयर्सना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही पत्र त्यासाठी पाठवण्यात येणार आहेत, जेणेकरून हिरक महोत्सव नसून अमृत महोत्सव आहे असे वर्षा बंगल्यावरील अधिकारी म्हणत नाहीत तोपर्यंत पत्रं पाठवत राहू' असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
हेही वाचा - कबीर खान यांची "द एम्पायर" वेब सिरीज कायमची बंद करा, भाजपाची मागणी