नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेते आमच्याकडून आपेक्षा करतात की, आम्ही त्यांना मदत करावी. आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आणि आम्ही तो देतोय. त्यावेळी त्यांनी मात्र, राजकारण करायचं. हे योग्य होणार नाही. त्यांनीही राजकारण बंद केले पाहिजे. ऊठसूट प्रत्येकाने केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि स्वत: मात्र हातावर हात धरून बसून राहायचं, हे चालणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनावले. ते रविवारी नागपूरात बोलत होते.
राज्य सरकारने या महामारीकडे मधल्या काळात दुर्लक्ष केले. बजेटमधून यंत्रणा उभी करणे अपेक्षित होते. पण त्याकडेही दुर्लक्ष केले. यामुळे मागील परिस्थितीवरून काहीच धडा न घेता कुठलीच व्यवस्था उभी केलेली नाही. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. यामुळे आता लॉकडाऊनवरूनची चर्चा थांबवावी आणि यंत्रणा उभी करण्याकडे लक्ष सरकारने द्यावे, असा सल्लाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका, संदीप देशपांडे देणार सडेतोड उत्तर
हेही वाचा - राज्य सरकार कोविड कमी करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेली - फडणवीस