नागपूर - पोलिसांच्या मारहाणीत अपमानित झाल्याने नागपूरच्या महेश राऊत यांनी आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली. याच कुटुंबियांची भेट भाजपाच्या महिला अडघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घेऊन सांत्वना केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या राज्यात पोलिसांचे काय चाललंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भेटीनंतर चित्रा वाघ माध्यमांशी बोलत होत्या.
कोणाला मदत करण्यासाठी महेश राऊत यांनी 100 नंबर वर पोलिसांच्या कंट्रोलरूमवर माहिती देण्यासाठी फोन केला होता. मात्र त्यांनतर फोन उचलला नाही म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. यात नीचपणाचा कळस म्हणजे पोलीस स्वता:चे पाप लपवण्यासाठी महेश याचे पत्नीसोबत भांडण झाल्याने आत्महत्या केल्याची म्हणत आहे, असा आरोप पोलिसांवर केला. दोन लेकरांचे पितृछत्र हरवले. कुटुंब उघड्यावर आले. पण अजून गुन्हा दाखल झाला नाही. आणि मृत्यूचे खापर पत्नीवर टाकण्याचा नीचपणा का केला जात आहे. भाजप या राऊत कुटुंबियांच्या पाठीशी आहे. यात त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
या प्रकरणात अजून गुन्हा दाखल झाला नसून अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयाला हलवण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक राज्यात काय चालले. पोलिसांचा हौदोस सुरू आहे. राऊत कुटुंबाचे छत्र हरवले. त्याची जवाबदारी मख्यमंत्री, गृहमंत्री घेणार का, असा सवाल त्यानी उपस्थित केला. तसेच कंट्रोल रूमचे नंबर काढले कशासाठी असे म्हणत अशी मारहाण होणार असले तर कोण मदतीला पुढे येईल, असाही सवाल त्यांनी केला आहे.