नागपूर - कर्नाटक पोटनिवडणुकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा विश्वास भाजप प्रवक्ते गिरीष व्यास यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच, भाजपने निवडणुकांची तयारीदेखील सुरू केली आहे.
हेही वाचा - नागपुरात राज्य सरकारच्या विरोधात पहिला मोर्चा
व्यास म्हणाले, "जनतेने महायुतीला कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे हे सरकार टिकणार नाही कारण, त्यात तीन भिन्न विचारधारांचे नेते एकत्र आलेले आहेत. त्यमुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुका होतील"