नागपूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या झुडपी-जंगलामुळे वन्य प्राण्यांसह पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील एक पक्षी आज सकाळी विमानाला धडल्याने 'इंडिगो एअरवेजचे' उड्डाण रद्द करावे लागले. नागपूरहून पुण्याला जाणारे हे विमान उडताना पक्षी त्याला धडकल्यामुळे विमान थांबविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली; मात्र त्यानंतर विमानाचे वेळापत्रक 'रीशेड्युल' करण्यात आले. नंतर हे विमान पुण्याला रवाना झाले होते.
विमानाचे इमर्जन्सी लँडिंग: सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे 26 फेब्रुवारी, 2023 रोजी 'इमर्जन्सी लँडिंग' अहमदाबादमध्ये करण्यात आले होते. माहितीनुसार, पक्ष्याच्या धडकेमुळे या विमानाचे लँडिंग करण्यात आले होते. या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक निवेदन प्रसारित केले होते.
विमानावर आदळला पक्षी: डीजीसीएने रविवारी अधिकृत निवेदनात घटनेविषयी माहिती दिली. यानुसार, सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाला पक्षी आदळल्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नागरी उड्डयन महासंचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, इंडिगो A320 विमान VT-IZI ऑपरेटिंग फ्लाइट 6E-646 (सूरत-दिल्ली) ला सुरत येथे टेकऑफ करताना पक्षी धडकला होता.
इंजिन फॅन ब्लेडमध्ये दोष: डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यानंतर विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. यामध्ये N1 कंपन 4.7 युनिट होते. या घटनेनंतर विमान अहमदाबादमध्ये सुरक्षित उतरविण्यात आले. DGCA च्या अधिकृत निवेदनानुसार, विमानाच्या तपासणीदरम्यान इंजिन फॅन ब्लेडमध्ये दोष आढळून आला. निवेदनात म्हटले आहे की, दुसऱया क्रमांकाच्या इंजिनच्या पंख्याचे ब्लेड खराब झाले होते. या विमानाला नंतर अधिकाऱ्यांनी 'एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड' (AOG) घोषित केले.
हेही वाचा:
- IT Engineer Murder Case Pune: आयटी इंजिनियरची 3 हजार रुपयांसाठी केली हत्या; दोन आरोपींना अटक
- Sanjay Raut FIR : ...म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
- Pradeep Kurulkar ATS Custody : प्रदीप कुरुलकरला एक दिवसाची 'एटीएस' कोठडी; हनी ट्रॅपमध्ये अजून एक एअर फोर्सचा अधिकारी?