नागपूर Bharat Gogavale on Aditya Thackrey : पूर्वी एकदा बाळासाहेब रेशीमबाग तिथं येऊन गेले होते. राऊत यांना कदाचित बाळासाहेब आठवत नसावे असं मला वाटतं. आम्ही शिंदेंबरोबर किडे म्हणून आलो तर ठीक आहे. किडे अत्यंत चांगलं मुलायम रेशीम विणतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या देश हितासाठी आम्ही ते चांगलं काम करण्यासाठी इथं नमस्कार करण्यासाठी आलो होतो, असं शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी म्हटलंय.
आदित्य ठाकरेंनी एकदा रेशीमबाग येऊन जावं : आम्ही रेशीमबागेत गेल्यावर तिथल्या मंडळींनी आम्हाला सांगितलं की, आदित्य एकदा छोटा असताना स्वतः बाळासाहेब इथं घेऊन आले होते. त्यावेळेला हा परिसर ते स्वतः पाहून गेले होते तर आता एकनाथ शिंदे आले त्यात काय फरक पडला, असा सवाल गोगावले यांनी राऊतांना विचारलाय. नेमकं संजय राऊतांच्या पोटात काय दुखतंय हे काढायला द्यायला पाहिजे. संजय राऊतांना त्याशिवाय बरं वाटणार नाही असंही गोगावले म्हणाले. जर आपले आजोबा इथं येऊन हा परिसर पाहून गेले असतील हे आदित्य ठाकरेंच्या लक्षात असेल तर ठीक आहे, नाहीतर त्यांना मी आठवण करून देतोय आणि त्यांना वाटलं तर त्यांनी येऊन जावं असा सल्ला गोगावलेंनी आदित्य ठाकरेंना दिलाय.
वेडं वाकडं बोलल्याशिवाय राऊतांचा दिवस : कोणाची इच्छा काय निर्माण होईल, कुठले विचार कधी तयार होतील हे तुम्ही आज सांगू शकत नाही. त्यामुळं आपले मुख्यमंत्री हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करत आहे. त्याच्यामुळं कोणाला दुःखी होण्याचं, वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु, संजय राऊतांना वेडं वाकडं काहीतरी बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही त्यांना झोप लागत नाही. एक तरी बाब मुख्यमंत्र्यांबरोबर काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.
हेही वाचा :