ETV Bharat / state

नागपूर पूर: राज्य शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी - चंद्रशेखर बावनकुळे न्यूज

कन्हान नदीच्या पुराचे पाणी अनेक गावांत शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आणि शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत.जारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नागपूरमधील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

nagpur flood update
नागपूर जिल्ह्यात पूर
author img

By

Published : Aug 29, 2020, 10:57 PM IST

नागपूर- मौदा तालुक्यातील अनेक गावांना कन्हान नदीच्या पुराचा फटका अनेक गावांचा बसला आहे. पुराचे पाणी गावांमध्ये शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आणि शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांनी आज पूरग्रस्त मौदा तालुक्याचा दौरा केला.

पूरग्रस्तांना मदत करण्याची बावनकुळेंची मागणी

मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्यामुळे चौराई धरणातून सात हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पेंच व तोतलाडोह धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे कन्हान नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे तालुक्यातील मौदा, चेहडी, झुल्लर, किरणापूर,वढणा, सिंगोरी,मोहखेडी, माथनी या गावांना पुराचा तडाखा बसला आहे. शेकडो घरे पाण्याखाली गेले आहेत. चेहडी, वढणा व मौद्यातील काही नागरिकांना तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या नेतृत्वात एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. तालुक्यातील तारसा, निमखेडासह कामठी तालुक्यातील भामेवाडा, जखेगाव, चिकना गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा-नागपूर पूर : नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू

पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांचे व पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे, त्यामुळे शासनाने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याला प्राधान्य द्यावे आणि नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी सुद्धा बावनकुळे यांनी केली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.